We know how special Virat is so we just have to wait and see : टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल ब्रिजटाउन मैदानावर होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपल्या जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या सामन्यात भारतीय चाहत्यांची खराब फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीची बॅट तळपावी, अशी आशा आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर आणि कर्णधार ख्रिस गेलने खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या फलंदाज विराट कोहलीचे समर्थन केले आहे. किंग कोहलीला कमी लेखता येणार नाही, असे या अनुभवी खेळाडूने सांगितले.

विराट कोहलीचा फॉर्म चिंताजनक –

सध्याच्या स्पर्धेत विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. विराट कोहली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने त्याला शून्यावर बाद केले होते. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये कोहलीने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये केवळ ७५ धावा केल्या आहेत.

Rishabh Pant scripts history, becomes first Indian to get out on duck in T20 World Cup final
IND vs SA Final : ऋषभ पंतने टी-२० विश्वचषकात केला विक्रम, फायनलमध्ये अशा प्रकारे आऊट होणारा ठरला पहिलाच भारतीय
What is the cut-off time for India vs South Africa T20 WC final as rain threatens the match
IND vs SA Final : पावसाने व्यत्यय आणला तर काय असणार ‘कटऑफ टाईम’? जाणून घ्या नियम
India Beat South Africa by 7 Runs and Win T20 World Cup 2024 Trophy
T20 World Cup 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट
Inzamam Ul Haq Statement on Rohit Sharma
“तू आम्हाला शिकवू नकोस”, रोहितच्या ‘डोकं वापरा’ वक्तव्यावर इंझमाम उल हक भडकले; म्हणाले, “त्याला सांगा…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Arshdeep Singh Trolled By Navjot Singh Sidhu
“Confidence 100, Skill 0”, विश्वचषकात १५ विकेट घेतलेल्या भारतीय गोलंदाजाचा ‘तो’ Video शेअर करत नवज्योत सिंग सिद्धूने काढला चिमटा

ख्रिस गेलने केले विराट कोहलीचे कौतुक –

विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी ख्रिस गेलने विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रतिक्रिया देत म्हणाला, “विराटसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत या गोष्टी घडतात. २०२३ च्या विश्वचषकात त्याची कामगिरी किती प्रभावी ठरली हे आपण पाहिली. वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. पण यातील चांगली गोष्ट म्हणजे तो संघात कायम आहे. त्यामुळे तो फायनल सामन्यात चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देऊ शकतो. विराट कोहली किती खास खेळाडू आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कोहलीला कमी लेखता येणार नाही. म्हणून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो फायनलमध्ये कशी कामगिरी करतो ते पहावे लागेल.”

हेही वाचा – IND vs SA Final : काशीत ‘विजय यज्ञ’ तर सिद्धिविनायक मंदिरात पूजा, भारताच्या विजयासाठी चाहत्यांनी देवाकडे घातलं साकडं, पाहा VIDEO

आयपीएलमध्ये कोहलीची बॅट गर्जत होती –

सध्याच्या स्पर्धेपूर्वी कोहली आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसला होता. या काळात त्याने १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने एक शतक आणि पाच अर्धशतकांसह ७४१ धावा केल्या. तो ऑरेंज कॅपच विजेता ठरला होता. मात्र २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात तो अपयशी ठरला आहे. अंतिम सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळपेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.