पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या ‘कर्मा’ ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटपटूंनी द्वेष भावनेला प्रोत्साहन देऊ नये असं आफ्रिदीने म्हटलं आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला इंग्लंडने पाच गडी राखून धूळ चारल्यानंतर शामीने ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया देताना नोंदवलेल्या मतावरुन आफ्रिदीने ही प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> World Cup Final आणि कर्म! पाकिस्तानच्या पराभवानंतर रोहित, विराटची टिंगल करण्यावरुन शाहीन आफ्रिदीला भारतीयांनी झापलं

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट करत आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यावर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ‘ही कर्माची फळं आहेत,’ असं ट्वीट केलं.

नक्की वाचा >> T20 World Cup Final: …म्हणून इंग्लंडच्या संघातील खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरले

याच ट्वीटसंदर्भात ‘समा’ टीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना आफ्रिदीने शामीला एक विनंती केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये एकमेकांविरोधात द्वेष भावना निर्माण करण्याचं काम शामीने करु नये असं आफ्रिदीने म्हटलं आहे. क्रिकेटपटू हे अनेकांचे आदर्श असतात. त्यामुळेच त्यांनी नीट वर्तवणूक केली नाही तर सामान्य लोकांकडून काय अपेक्षा करणार? असा प्रश्न आफ्रिदीने विचारला आहे. “द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी आपण करता कामा नये. आपणच अशा गोष्टींची सुरुवात केली तर आपण सामान्य नागरिकांकडून काही अपेक्षा ठेऊ शकत नाही,” असं आफ्रिदी म्हणाला.

नक्की वाचा >> England Win World Cup: ऋषी सुनक असा साजरा करणार पाकिस्तानविरोधातील विजय; भारतीय खेळाडूने पोस्ट केलेला Video Viral

क्रिकेटपटू हे आदर्श असतात. त्यांच्याकडे खेळाचा प्रचार करणारे महत्त्वाचा दुवा असं म्हटलं जातं. त्यांनी लोकांमधील द्वेष संपवण्याचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षाही आफ्रिदीने व्यक्त केली. “आपण क्रिकेटपटू आहोत. आपण या खेळाचे प्रसारक आणि आदर्श आहोत. आपण (द्वेष, मत्सर यासारख्या) सर्व गोष्टी संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण शेजारी आहोत,” असं आफ्रिदी शामीच्या ट्वीटबद्दल म्हणाला.

नक्की वाचा >> “…म्हणून धोनीने जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर दिली”; २००७ च्या भारत-पाकिस्तान World Cup Final बद्दल शोएब मलिकचा खुलासा

“दोन्ही देशांमधील नातं हे खेळामुळे सुधारण्यास मदत होईल. आम्हाला त्यांच्याबरोबर खेळायचं आहे. त्यांनी पाकिस्तानात येऊन खेळावं असं आम्हाला वाटतं,” असंही आफ्रिदी म्हणाला. तसेच आफ्रिदीने शामीला सध्या संघाचा भाग असताना अशी वक्तव्य टाळावीत असाही सल्ला दिला. “निवृत्त झालेले खेळाडू असाल तरी तुम्ही असं करता कामा नये. तू तर सध्या संघाचा भाग आहेस त्यामुळे तू हे टाळलं पाहिजे,” असं आफ्रिदीने शामीला सल्ला देताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We should not cultivate hate shahid afridi responds to mohammed shami tweet after pakistan loss to england scsg