Kamran Akmal’s Controversial Statements About Arshdeep Singh : अलीकडेच पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने अर्शदीप सिंगबद्दल वांशिक टिप्पणी केली होती. यानंतर अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने संतप्त प्रतिक्रिया देताना कामरान अकमलला चांगलेच खडसावले होते. आता कामरान अकमलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून हरभजन सिंग आणि संपूर्ण शीख समुदायाची माफी मागितली आहे. ९ जून रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामन्यादरम्यान कामरानने अर्शदीप आणि त्याच्या धर्माबद्दल असभ्य टिप्पणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामरानने अर्शदीप सिंगबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य –

एआरवाय वाहिनीवर बोलताना कामरानने अर्शदीपसंदर्भात केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग कामरानच्या वक्तव्याने चांगलाच नाराज झाला. भारत-पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान अकमलने अर्शदीपच्या धर्माबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. अर्शदीपने भारतीय डावातील शेवटचे षटक टाकले, ज्यात त्याने १८ धावांचा बचाव केला. यावर, हरभजन सिंगने रिपोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अकमल म्हणत आहे की, “काहीही होऊ शकते.१२ वाजले आहेत.” असे बोलून तो जोरजोरात हसायला लागतो.

हरभजन सिंगने कामरानला खडसावले –

अर्शदीप सिंगवर कमेंट केल्याने कामरान अकमलला हरभजन सिंगच्या रोषाला सामोरे जावे लागले. भज्जीने लिहिले होते की, “कामरान अकमल तुझा धिक्कार आहे. तुझे घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी शिखांचा इतिहास जाणून घ्यायला हवा. आम्ही शीखांनी तुमच्या माता-भगिनींना वाचवले होते, जेव्हा त्यांना आक्रमणकर्त्यांनी पळवून नेल्या होत्या, वेळ रात्रीचे १२ वाजले होते. त्यामुळे तुम्हा लोकांना लाज वाटली पाहिजे. कामरान अकमल तुम्ही याबद्दल खरं तर आभार मानायला हवे.”

हेही वाचा – विम्बल्डन विजेतेपद राखण्याचे आव्हान – अल्कराझ

कामराने वादग्रस्त वक्तव्यानंतर जाहीरपणे मागितली माफी –

यानंतर आता कामरान अकमलने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने माफी मागितली आणि लिहिले, “माझ्या अलीकडील टिप्पण्यांबद्दल मला मनापासून खेद वाटतो आणि हरभजन सिंग आणि शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. माझे शब्द अयोग्य आणि अपमानास्पद होते. मला जगभरातील शीख लोकांबद्दल खूप आदर आहे आणि माझा कधीही कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मला खरच माफ करा.”

हेही वाचा – BAN vs SA T20 World Cup: लेगबाईज नाकारल्या, बाऊंड्री मिळूनही मिळाल्या ० धावा आणि नियमाने केला बांगलादेशचा घात

अखेरच्या षटकात अर्शदीपने सामना जिंकवला –

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेला सामना अतिशय रोमांचक होता, जो रोहित शर्मा आणि कंपनीने ६ धावांनी जिंकला. पाकिस्तानला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १८ धावांची गरज होती, परंतु अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करत १८ धावांचा बचाव केला आणि टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला सातव्यांदा पराभूत केले.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We sikhs saved your mothers sisters harbhajan singh slams kamran akmal for disrespecting arshdeep singh latter apologises vbm