वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाचा पराभव करत सुपर८ मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा १३ धावांनी विजय मिळवला आहे. शेरफने रूदरफोर्डच्या वादळी ६८ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाला विजयासाठी १५० धावांचे योगदान दिले. ३२ धावांवर ५ विकेट गमावले असतानाही वेस्ट इंडिजने चांगले कमबॅक करत धावांचा डोंगर रचला. तर गोलंदाजीत विडींजच्या गोलंदाजांनी लक्ष्याचा बचाव करत बलाढ्य न्यूझीलंडला पराभवाचा मोठा धक्का दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून न्यूझीलंडचा पराभव झाल्याने किवी संघावर टी-20 विश्वचषकातून बाहेर होण्याची वेळ येऊ शकते. न्यूझीलंडने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरूद्धचा सलग दुसरा सामना गमावल्याने शेवटच्या स्थानी आहेत. विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाचे अजून दोन सामने पापुआ न्यु गिनी आणि युगांडा यांच्याविरूद्ध शिल्लक आहेत. सुपर८ मध्ये पोहोचायचे असेल तर संघाला हे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पण जर अफगाणिस्तानने १४ जूनच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केला तर न्यूझीलंड संघ अधिकृतपणे वर्ल्डकपमधून बाहेर होईल.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

सुपर८ फेरीसाठी पात्रतेच्या दृष्टिकोनातून क गटातील पॉइंट टेबलवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचा संघ तीन सामने जिंकून सुपर८ मध्ये पोहोचला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी आणि न्यूझीलंडमधील कोणताही एक संघ या गटातून सुपर८ मध्ये पोहोचेल. सध्या अफगाणिस्तानचा संघ सुपर८ मध्ये पोहोचण्याची अधिक शक्यता आहे, कारण संघाचा एक सामना नवख्या संघासाठी म्हणजेच पापुआ न्यू गिनी विरुद्ध आहे, ज्याने आधीच दोन सामने गमावले आहेत. याशिवाय वेस्ट इंडिजविरुद्ध एक सामना संघाला खेळायचा आहे. तर युगांडा, पीएनजी आणि न्यूझीलंडचा नेट रन रेट खूपच खराब आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तान संघाने आपले दोन्ही सामने जवळच्या फरकाने गमावले तरी ते सुपर८ मध्ये सहज जाऊ शकतात.

त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. १८व्या षटकातच संघाच्या ९ विकेट्स पडल्या होत्या आणि त्यावेळी संघाची धावसंख्या फक्त ११२ धावा होती, परंतु शेरफेन रदरफोर्डने शेवटच्या दोन षटकात एकट्याने ३७ धावा करून सामन्याचे रूप पालटले. त्याचवेळी न्यूझीलंड संघ १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा २० षटकांत ९ गडी गमावून १३६ धावा करता आल्या आणि सामना १३ धावांनी गमावला. या स्पर्धेतील किवी संघाचा हा दुसरा पराभव असून त्यांचा नेट रन रेट आधीच खराब आहे. अशा स्थितीत संघ स्वबळावर सुपर८ साठी पात्र ठरू शकणार नाही. न्यूझीलंडच्या टॉप ऑर्डरने पुन्हा एकदा संघाची निराशा केली. संघाने पाच विकेट ६३ धावांत गमावल्या होत्या. पण ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरने शानदार फटकेबाजी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. सँटनरने शेफर्डच्या अखेरच्या षटकात तीन षटकार लगावले पण धावा जास्त असल्याने फारसा फरक पडला नाही.

हेही वाचा- “अचानक टॉससाठी रोहित शर्माला पाहता…” IND vs USA सामन्यापूर्वी अमेरिका संघातील भारतीय खेळाडू झाले भावुक

न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने तीन, टीम साऊथी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी २ विकेट घेतले. त्याचवेळी १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी किवी संघ मैदानात उतरला तेव्हा संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र, म्लेन फिलिप्सने ४० धावा आणि मिचेल सँटनरने २१ धावा करून काहीशा आशा उंचावल्या, मात्र अल्झारी जोसेफच्या ४ विकेट आणि गुडाकेश मोतीच्या ३ विकेट्समुळे वेस्ट इंडिजने विजय मिळवला आणि सलग तिसरा सामना जिंकण्यात संघाला यश आले. शेवटची दोन षटके न्यूझीलंडसाठी महागडी ठरली, ज्यामुळे सामन्याचा रोख बदलला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies beat new zealand by 13 runs and reached super eight of t20 world cup 2024 bdg
Show comments