ट्वेन्टी२० वर्ल्डकपचे यजमान असलेल्या वेस्ट इंडिजने अनुनभवी युगांडाला ३९ धावांत गुंडाळत प्रचंड विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावांची नोंद केली. अकेल हुसेनच्या फिरकीच्या बळावर यजमानांनी युगांडाला अर्धशतकही गाठू दिलं नाही. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत नीचांकी धावसंख्येच्या विक्रमाची युगांडाने बरोबरी केली. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेतला धावांच्या फरकाने मिळवलेला दुसऱ्या क्रमांकाचा विजय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रोव्हिडन्स इथे झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉन्सन चार्ल्स आणि ब्रँडन किंग यांनी ४१ धावांची सलामी दिली. चार्ल्सने फटकेबाजी सुरु ठेवत ४४ धावांची खेळी केली. निकोलस पूरन (२२), रोव्हमन पॉवेल (२३) आणि शेरफन रुदरफोर्ड (२२) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. आंद्रे रसेलने १७ चेंडूत ६ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. युगांडातर्फे ब्रियान मसाबाने २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना युगांडाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जुमा मियागीचा अपवाद वगळता युगांडाच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. डावखुरा फिरकीपटू अकेल हुसेनने ४ षटकात ११ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स पटकावल्या. अल्झारी जोसेफने २ तर रोमारिओ शेफर्ड, आंद्रे रसेल, गुदकेश मोटी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत हुसैनला चांगली साथ दिली. अकेललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वेस्ट इंडिजने पहिल्या लढतीत पापुआ न्यू गिनी तर या लढतीत युगांडावर दणदणीत विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली आहे.