भारतीय निवड समितीने न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दोन्ही मालिकेतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियात पुनरागमन करू शकेल, असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही आणि दोन्ही मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर टी२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे, तर बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराह सप्टेंबरपासून संघाबाहेर आहे. आता बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी त्याच्या फिटनेसबाबत वक्तव्य केले आहे.

कार्तिक आणि पृथ्वी शॉबद्दल चेतन शर्मांचे वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी दिनेश कार्तिकला भारतीय संघात न घेतल्याबद्दल चेतन शर्मा यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “कार्तिकचे वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेऊन संघात स्थान देण्यात आलेले नाही. तो एक उत्कृष्ट मॅच फिनिशर आहे. त्याचवेळी पृथ्वी शॉ ला संघात स्थान देण्यात आले नाही, यावर देखील शर्मा म्हणाले, “निवड समिती पृथ्वीच्या कामगिरीवर सतत लक्ष ठेवून आहे. तो चांगला खेळत आहे. तो लवकरच संघात पुनरागमन करू शकतो.”

हनुमा विहारी आणि सरफराज यांचा समावेश न करण्याबाबत वक्तव्य

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हनुमा विहारीचाही भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. यावर चेतन शर्मा म्हणाले, “आमच्याकडे मधल्या फळीत सध्या जागा नाही. या पदासाठी श्रेयस अय्यरसह अनेक दावेदार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत हनुमा विहारीला संघात स्थान मिळू शकले नाही. विहारी प्रतिभावान नाही असे नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या सरफराज खानचा संघात समावेश नसल्याच्या प्रश्नावर चेतन म्हणाले, “सरफराजच्या कामगिरीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या नावाबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. योग्यवेळी संघात स्थान देण्यात येईल असे यावर त्यांनी उत्तर दिले.

हेही वाचा :  T20 World Cup: वानिंदू हसरंगाची शानदार गोलंदाजी! अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर ठेवले १४५ धावांचे लक्ष्य 

आम्ही सर्व खेळाडूंच्या खेळीवर लक्ष ठेवून आहोत. अनेक वेळा संघाची गरज लक्षात घेऊन खेळाडूंना संघात स्थान दिले जाते. बांगलादेशातील खेळपट्टीची परिस्थिती लक्षात घेऊन कसोटी संघाची निवड करण्यात आली आहे. सरफराज खान लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What did the chief selector say about karthiks dismissal a statement was also made regarding the non selection of prithvi shaw sarfraz avw