एमएस धोनी हे एक असे नाव आहे, जे निःसंशयपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेले आहे. परंतु असे असूनही तो अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात राहतो. माही पुन्हा एकदा चर्चेत आला असून यामागचे कारण खूपच रंजक आहे. द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि महान फिनिशर एमएस धोनीने हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत सारख्या स्टार खेळाडूंना राउंड बॉटम बॅटने खेळण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान माही भारतीय संघाचा मार्गदर्शक होता. तसेच त्यानंतरही तो युवा खेळाडूंच्या सतत संपर्कात आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना आणि आयपीएल दरम्यान देखील पॉवर हिटिंगसाठी गोल बॉटम बॅट वापरत असे. आता माहीने या बॅटचा वापर करून भारतीय खेळाडूंना शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करण्याचा सल्ला दिला आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

हार्दिक आणि पंत यांच्याकडे सॅन्सापरिलेस ग्रीनलँड्स (एसजी) बॅट मेकर आहे. तसेच टी-२० फॉरमॅटमध्ये त्यांची बॅटिंग सुधारण्यासाठी एसजीला राउंड बॉटम बॅट्स बनवण्यास सांगण्यात आले आहे. या बातमीबद्दल अधिक माहिती देताना, एसजीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पारस आनंद यांनी दिली आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : ‘जर थोडीशीही लाज असेल तर रमीझ राजा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’; पराभवानंतर माजी खेळाडूची मागणी

राउंड बॉटम बॅटची मागणी वाढली –

पारस आनंद यांनी टीओआयशी बोलताना सांगितले की, “एमएस धोनीने २०१९ च्या विश्वचषकापूर्वी अशा प्रकारची बॅट वापरण्यास सुरुवात केली होती. आता भारतीय संघातील खेळाडूं देखील अशा प्रकारच्या बॅटची मागणी करत आहेत. खेळाडूंचा दावा आहे की, ही बॅट त्यांना मैदानाच्या सर्व दिशांना फटके मारण्यास मदत करते.”

राउंड बॉटम बॅटचा काय आहे फायदा –

जर तुम्हालाही या राउंड बॉटम बॅटबद्दल जास्त माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. जर आपल्याला या बॅटच्या फायद्यांबद्दल बोलायचे, तर राउंड बॉटम बॅटचा बेस मान्य बॅटपेक्षा थोडा जाड असतो. त्यामुळे या जाड बेसमुळे फलंदाजाला यॉर्कर चेंडू खेळण्यात काहीशी सहजता मिळते. एवढेच नाही तर ही बॅट फलंदाजांना बॅट स्विंग करून चेंडू लवकर उचलण्यासही मदत करते. आपण असे म्हणू शकता की या प्रकारची बॅट बेस बॉलच्या बॅटसारखी स्ट्रोक प्रदान करते.

हेही वाचा – IND vs SA T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ‘या’ गोलंदाजांपासून राहावे सावध, डेल स्टेनचा सल्ला

Story img Loader