What is the cut-off time for IND vs SA Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे करोडो चाहते पाहत आहेत. बार्बाडोसमध्ये शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा शानदार सामना सुरू होईल. मात्र, या सामन्यात पावसाचा जोर कायम आहे. अशा परिस्थितीत जर पावसाने व्यत्यय आणला तर काय असणार ‘कटऑफ टाईम’? याबद्दल जाणून घेऊया.

रात्री ११.१० पर्यंत आहे ‘कटऑफ टाईम’ –

वृत्तानुसार, सध्या हवामान स्वच्छ आहे, परंतु ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची ६० टक्के शक्यता आहे. सामना सुरू होण्यापूर्वी सुमारे ६० मिनिटे किंवा एक तासाचा ‘बफर टाईम’ ठेवला जातो. त्यानंतर षटके कपात केली जाऊ लागतात. म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजता सामना सुरू झाला तर ४० षटकांचा संपूर्ण सामना पाहता येईल, परंतु त्यानंतर षटकं कपात केली जाऊ शकतात. किंवा १०-१० षटकांचा सामनाही पाहिला मिळू शकतो. सामना सुरू करण्याची शेवटची वेळ ११.१० (भारतीय वेळेनुसार १: ४०) आहे. म्हणजे या वेळेपर्यंत सामना सुरू झाला तर ठीक, नाहीतर तो राखीव दिवशी खेळवला जाईल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the cut off time for ind vs sa t20 world cup 2024 final as rain threatens the match in barbados vbm
First published on: 29-06-2024 at 19:27 IST