Sourav Ganguly on Team India : अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टी-२० विश्वचषक २०२४ सुरू झाला आहे. भारतीय संघही अमेरिकेत असून बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात नेत्रदीपक विजय संपादन केला आहे. असे असतानाही टीम इंडियावर विजेतेपदासाठी खूप दडपण आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. तेव्हापासून विजेतेपदाची प्रतीक्षा सुरूच आहे. त्याच वेळी, जर आपण आयसीसी ट्रॉफीबद्दल बोललो तर २०१३ नंतर एकही विजेतेपद जिंकलेले नाही. टी-२० विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी सौरव गांगुलीने संघाच्या दबावावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेट हा भारतीयांसाठी सर्वात उत्कट खेळ आहे आणि जेव्हाही भारतीय संघ विश्वचषकात खेळतो, तेव्हा भावना गगनाला भिडतात. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचे असे मत आहे की, राहुल द्रविड आणि त्याच्या संघाला टी-२० विश्वचषकात यशस्वी होण्यासाठी अधिक आरामदायी असणे आवश्यक आहे. माजी कर्णधाराच्या मते, खूप दबावाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल.
अनुष्का आणि रितिकाबद्दल गांगुली काय म्हणाला?
रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, भारत खूप दबाव आणण्याची चूक करतो, जे विराट कोहली आणि रोहित शर्माच्या पत्नींना पाहून अनेकदा स्पष्ट होते. तो म्हणाला, “जर मी राहुल द्रविडला काही सांगू शकलो, तर हेच सांगेन की खेळाडूंना विश्रांती आणि मोकळीक द्यावी. कारण मी जेव्हा रोहितच्या पत्नीला (रितिका सजदेह) स्टँडवर असताना पाहतो, तेव्हा मला ती किती दडपणाखाली आहे हे स्पष्ट होते. तसेच जेव्हा मी विराटच्या पत्नीला पाहतो, तेव्हा मला समजते की तिला कोणत्या प्रकारचे दडपण आहे.”
हेही वाचा – IND vs BAN : हार्दिक पंड्याच्या शॉटने बांगलादेशच्या खेळाडूला गंभीर दुखापत, हाताला पडले तब्बल टाके
‘टीम इंडियाने फक्त कोणतेही दडपण न घेता खेळावे’ –
माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला, “आम्ही भारतात खूप दबाव आणण्याची चूक करतो. उदाहरणार्थ मी २००३ च्या विश्वचषक फायनलबद्दल विचार करतो. जर काही असेल तर मोठे सामने खेळताना आपल्याला मुक्त आणि बिनदास्त खेळण्याची गरज आहे. त्यामुळे टीम इंडियाने फक्त कोणतेही दडपण न घेता खेळावे.” भारत २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
वनडे विश्वचषकातील पराभवाचे सांगितले कारण –
जेतेपदाच्या सामन्यात संघ थोडा शांत राहिला असता तर कदाचित चांगली कामगिरी केली असती, असे गांगुलीला वाटते. तो म्हणाला, “विश्वचषकात फायनल गमावूनही, मी म्हणेन की भारत हा सर्वोत्तम संघ होता. आपण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्रिकेट खेळलो. पण अंतिम फेरीत आपण थोडे शांत राहू शकलो नाही. मला तेच हवे होते. त्यामुळे आता टी-२० विश्वचषकात बिनदास्त खेळावे आणि स्वतःवर जास्त दबाव आणू नये.”