आयसीसी टी२० विश्वचषकाची सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या स्पर्धेविषयी अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत. दरम्यान, भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही आपल्या टॉप चार संघांची निवड केली आहे. इतकंच नाही तर कोणता संघ डार्क हॉर्स ठरू शकतो याचाही खुलासा त्याने यावेळी केला आहे.

एका मुलाखतीमध्ये सचिन म्हटलंय, “भारतीय संघ चॅम्पियन व्हावा अशी माझी इच्छा आहे. तथापि, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचा माझ्या टॉप चारमध्ये समावेश आहे. तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ डार्क हॉर्स आहेत, कारण त्यांना सर्व परिस्थिती माहित आहेत. दक्षिण आफ्रिकेने सप्टेंबर-ऑक्टोबर याच परिस्थितींचा सामान केला आहे. हे दोन्हीही संघ कधीही टॉप-४ मध्ये प्रवेश करू शकतात.”

वेस्ट इंडिजच्या सामान्यादरम्यानच स्टँडवरून बाळ खाली पडलं आणि…; धक्कादायक अपघात कॅमेरात कैद

ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीच्या आधारावर सचिनने आपले टॉप चार संघ निवडले आहेत. मात्र यातील कोणते संघ खरंच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचतील हे वेळ आल्यावरच समजेल. दरम्यान, २३ ऑक्टोबरला भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळेल. पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला होता. त्याचवेळी इंग्लंडने पाकिस्तानवर ६ विकेट्सने मात केली.

टी२० विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल जाहीर

आयसीसीने टी२० विश्वचषकात सहभागी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. समालोचकांची या यादीमध्ये भारताच्या हर्षा भोगले, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांचा समावेश आहे. याशिवाय नुकतेच निवृत्त झालेले इयॉन मॉर्गन, प्रेस्टन मॉमसेन, डेल स्टेन आणि नियाल ओब्रायन यांसारखे माजी क्रिकेटपटूही सामन्यादरम्यान समालोचन करताना दिसतील. या स्पर्धेसाठी नामांकित २९ समालोचकांच्या गटात मेल जोन्स, इसा गुहा आणि नताली जर्मनोस महिला समालोचक म्हणून उपस्थित राहतील.

Story img Loader