Shivam Dube reacts to Virat Kohli’s form : भारतीय संघ शनिवारी कॅनडाविरुद्ध आपला गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. खरे तर गेल्या तीन सामन्यांत त्याला केवळ पाच धावाच करता आल्या आहेत. फलंदाजीची सुरुवात करताना तो अमेरिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात तो पहिल्यांदाच गोल्डन डकचा बळी ठरला. मात्र, कॅनडाविरुद्धच्या सामन्यापूर्वी शिवम दुबेने किंग कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोहलीला विश्वचषकात गवसला नाही सूर –

आयपीएलमध्ये आरसीबीसाठी १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ७०० हून अधिक धावा केल्या होत्या. यानंतर विराट कोहलीने टी-२० विश्वचषकात सहभागी झाला असून त्याला अजून सूर गवसलेला नाही. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांत त्याला १.६६ च्या सरासरीने केवळ पाच धावा करता आल्या आहेत, ज्यामध्ये अमेरिकेविरुद्ध पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद होण्याचा समावेश आहे. त्याच्याकडून आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा चांगली कामगिरी अपेक्षित आहे, जी कदाचित १३ वर्षांनंतर आयसीसीचे दुसरे विजेतेपद जिंकण्याची भारताची शेवटची संधी आहे.

शिवम दुबे विराटबद्दल काय म्हणाला?

टी-२० विश्वचषक २०२४ च्या ३३ व्या सामन्यापूर्वी शिवम दुबेने पत्रकार परिषदेत किंग कोहलीच्या फॉर्मबद्दल सांगितले. विराटने गेल्या तीन सामन्यांमध्ये धावा केल्या नसल्या तरी पुढील तीन सामन्यांमध्ये तो शतके झळकावू शकतो, असा आशावाद त्याने व्यक्त केला. दुबे म्हणाला, “कोहलीबद्दल बोलणारा मी कोण आहे? जर त्याने तीन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत, तर तो पुढील तीन सामन्यांमध्ये तीन शतके ठोकू शकतो आणि नंतर चर्चा होणार नाही.” सध्या कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करणारा कोहली लवकर बाद झाल्यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळत नाही आणि नंतर येणाऱ्या फलंदाजांवर दबाव येत आहे.

हेही वाचा – “असं काय आहे जे तुला येत नाही?”, T20 वर्ल्डकप गाजवणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांचा प्रश्न

न्यूयॉर्कमध्ये कोणत्याही संघाला १५० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत –

भारताने आतापर्यंत विश्वचषकातील आपले तिन्ही सामने न्यूयॉर्कमध्ये खेळले आहेत. नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी डोकेदुखी होती. या मैदानावर झालेल्या आठ सामन्यांमध्ये कोणत्याही संघाला दीडशेहून अधिक धावा करता आल्या नाहीत. आता लॉडरहिलमध्ये भारताचा सामना कॅनडाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांना चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा – SA VS NEP T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेने नेपाळला चमत्कारापासून रोखलं; अवघ्या एका धावेने थरारक विजय

कॅनडा : साद बिन जफर (कर्णधार), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक), निकोलस किर्टन, रविंदरपाल सिंग, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.