Harleen Deol Catch Video Went Viral After Suryakumar Yadav Catch: भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रोमहर्षक सामन्यात ७ धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्याचे फोटो व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला व्हीडिओ आहे सूर्यकुमारचा यादवचा अविश्वसनीय झेल. सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात सीमारेषेजवळ जबरदस्त झेल टिपला. आता यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या हरलीन देओलचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो”

Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ

भारताला अखेरच्या षटकात ६ चेंडूत १६ धावा वाचवायच्या होत्या. हार्दिक पंड्या गोलंदाजीला आणि त्याने मिलरला पहिलाच चेंडू टाकला. मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या फुल टॉस चेंडूवर मोठा फटका मारला, हा चेंडू हवेत उंच उडाला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे सूर्यकुमार सीमारेषेच्या जवळ होता. क्षणभर असे वाटत होते की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण सूर्यकुमारने कमालीची कामगिरी करत अप्रतिम झेल घेत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. या कॅचनंतर हरलीनचाही असाच कॅच जो तिने २०२१ च्या सामन्यात टिपला होता तो व्हायरल होत आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

हरलीन देओलच्या कॅचचा व्हीडिओ व्हायरल

२०२१ मध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिकेतील सामना नॉर्थम्ट्नमध्ये सुरू होता. यजमान इंग्लंडकडून एमी एलेन जोन्स २६ चेंडूत ४३ धावा करत फलंदाजी करत होती. तर भारताकडून शिखा पांडे गोलंदाज होती. जोन्सने शिखा पांडेचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या हरलीनने आपले कौशल्य दाखवत झेल टिपण्यासाठी हवेत झेप घेतली. तिने बॉल पकडला आणि तिचा तोल जात असल्याचे तिला जाणवताच बॉल सीमारेषेबाहेर टाकला आणि ती सुध्दा सूर्याप्रमाणे सीमारेषेच्या पलीकडे गेली. पण त्यानंतर हरलीनने सीमारेषेच्या आत पुन्हा डाईव्ह घेत हवेत फेकलेला चेंडू टिपला.

हेही वाचा – IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

२०२१ मध्येही त्या सामन्यानंतर हरलीनच्या या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. महिला क्रिकेटमध्ये असा झेल पहिल्यांदाच टिपला गेला असेल, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

सूर्यकुमारचा टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातील या कॅचचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हरलीन देओलच्या या कॅचचा व्हीडिओ शेअर केला आहे. सूर्यासारखा झेल हरलीननेही पकडला होता, आठवतोय का; असे एका व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.