टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात होणार आहे. गतविजेता ऑस्ट्रेलियाने २०२१च्या टी२० विश्वचषकात न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पराभव करून पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले होते त्याचा वचपा आजच्या सामन्यात काढणार का हे पाहणे औत्सुक्तेचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० सामना २२ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळवला जाणार आहे. सिडनीची खेळपट्टी ही जितकी गोलंदाजांसाठी उपयुक्त तितकीच फलंदाजांसाठी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडनी येथे यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंड असला तरी. याव्यतिरिक्त, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आयर्लंडचे संघ टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ ग्रुप ए मध्ये आहेत. यापैकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हटले जात असल्याने या सामन्याकडे सर्व संघांच्या नजरा असतील.

सिडनीमध्ये नाणेफेक जिंकणे आणि प्रथम गोलंदाजी करणे हे संघांसाठी फायद्याचे असेल. या खेळपट्टीवर मोठ्या धावांचा सामना पाहता येईल आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची नजर १८० च्या वरच्या धावांवर असेल. ऑस्ट्रेलियातील वातावरण पाहिले तर तेथे मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे हा सामना होणारा की नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, कारण या सामन्याच्या दिवशीही तेथील हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शवली आहे.

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), अ‍ॅश्टन अ‍ॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

न्यूझीलंड संघ

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साउथी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लचलान फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2022 super 12 matches begin today australia will face new zealand in the first match avw