टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने झिम्बाब्वेला पराभूत करत ‘सुपर १२’च्या फेरीमध्ये दुसऱ्या गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. या विजयासहीत भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. भारताचा पुढचा सामना १० नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या गटामध्ये दुसऱ्या स्थानी पात्र ठरलेला इंग्लंडचा संघ अॅडलेडच्या आमने-सामने येणार आहेत. या सामन्याची आतापासूनच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान या सामन्यासंदर्भात भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफरने थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्वीटरचा मालकी हक्क ताब्यात घेणाऱ्या एलॉन मस्कला एक रंजक प्रश्न विचारला आहे. सध्या जाफरच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
नक्की वाचा >> Ind vs Eng T20 World Cup Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने
वसीम जाफर हा त्याच्या मिम्स आणि ट्वीटरवरील हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. सामन्यांदरम्यान भन्नाट पोस्ट करणारा जाफर हा नेटकऱ्यांचा लाडका आहे. क्रिकेट कारकिर्दीमध्ये काहीसा दुर्लक्षित राहिलेला जाफर हा सध्या ट्वीटरवर ट्रेण्डींगही असतो. पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशा पल्लवीत झाल्यानंतर वसीमने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला होता. जाफरने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये एका टीव्ही शोवरील कार्यक्रमात पाकिस्तानी व्यक्ती फुटबॉल विश्वचषकासाठी लिहिलेलं वाका वाका गाणं गाताना दिसत आहे. मात्र मूळ शब्दांऐवजी अगदी वाटेल त्या शब्दांमध्ये ही व्यक्ती गात असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचाही उल्लेख आहे. वसीम जाफरने हा व्हिडीओ, “पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघांच्या चाहत्यांची सध्याची स्थिती” असं म्हणत पोस्ट केला आहे.
नक्की वाचा >> Virat Kohli Salute Video: …अन् विराटनं मैदानातच ठोकला कडकडीत सॅल्यूट; जाणून घ्या हे सॅल्यूट सेलिब्रेशन असतं तरी काय
हे मूळ गाण शकीरा या अमेरिकन गायिकेनं २०१० साली झालेल्या फुटबॉल विश्वचषकासाठी गायलं होतं. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका या थिमवर हे गाणं होतं. याच गाण्याचं हे पाकिस्तानी व्हर्जन वसीमने अगदी मजेदार पद्धतीने वापरलं आहे. तीन हजारांहून अधिक वेळा हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटनंतर वसीमने भारत टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी ठरल्यानंतर नवं ट्वीट केलं ज्यामध्ये त्याने थेट एलॉन मस्कला एक प्रश्न विचारला आहे. भारताच्या पुढील सामन्याचा संदर्भ देत जाफरने मस्कला हा प्रश्न विचारला आहे.
नक्की वाचा >> World Cup: चार फोटो, एक शब्द अन् १० हजारांहून अधिक शेअर्स… Ind vs Zim सामन्यानंतर विराटने केलेल्या पोस्टची चर्चा
“हाय एलॉन मस्क, मला कल्पना आहे की व्हेरिफाइड ट्वीटर अकाऊंटसाठी महिन्याला आठ डॉलर्स आकारले जाणार आहेत. मात्र कायम अपयशी ठरणारे किंवा अपयशाला घाबरणारे अशी ओळख निर्माण झालेल्यांकडून किती पैसे आकारले जाणार आहेत. मी एका मित्रासाठी ही विचारपूस करत आहे,” असं जाफरने म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने तोंडाला चैन लावलेला इमोजीही वापरला असून भारत विरुद्ध इंग्लंड आणि टी-२० विश्वषचक असे हॅशटॅगही वापरले आहेत.
नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
यापूर्वी अनेकदा वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनदरम्यान ट्वीटरवर शाब्दिक युद्ध झाल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. त्यामुळे या ट्वीटखाली अनेकांनी मायकल वॉनला टॅग करुन जाफर तुझ्यासाठी चौकशी करतोय का असं म्हटलं आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यांबरोबरच क्रिकेटसंदर्भातील अनेक मुद्द्यांवरुन अनेकदा ट्वीटरवर जाफर विरुद्ध वॉन असा सामना रंगल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीमधील सामन्याच्या पार्श्वभूमीवर मैदानाबाहेर हा आगळा-वेगळा सामना रंगणार का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच.