पाकिस्तान क्रिकेट संघाने १९९२ मध्ये पहिला विश्वचषक जिंकला होता. इम्रान खानच्या संघाने रंगीत जर्सीमध्ये खेळलेल्या ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारामध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. इस्लामिक समजुतीनुसार तेव्हा पवित्र रमजान महिना चालू होता. पाकिस्तानी संघातील बहुतांश सदस्य आणि सपोर्ट स्टाफ स्पर्धेदरम्यान उपवास करत असे. आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा तीच कहाणी समोर येत आहे. यावेळीही बाबर आझमच्या संघाने इम्रान खानसारखाच चमत्कार करून अंतिम फेरी गाठली आहे.
१९९२ मध्येही पाकिस्तानी संघाने रोजा केले होते. मात्र, तेव्हा रमजानचा पवित्र महिना सुरू होता आणि अल्लाहने त्यांना ईदपूर्वी ईदी दिली होती. १९९२ मध्ये एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जे घडले होते, तेच पुन्हा त्यांच्यासोबत घडत असल्याचे पाकिस्तान संघाला वाटते. १९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत चांगली कामगिरी केली होती. १९९२ प्रमाणेच आता पुन्हा एकदा फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
बाबर आझमची संपूर्ण संघ आणि संघांचे सर्व मुस्लिम सपोर्ट स्टाफ रविवारी १३ नोव्हेंबरला उपवास करणार आहेत. सामन्याच्या दिवसाव्यतिरिक्त संघातील सर्व लोक उपवास करतात मात्र हे सर्व सामन्याच्या दिवशी देखील रविवारी उपवास करणार आहेत. यावेळी ईद नसली तरी अल्लाह आपल्या संघाला ईद देऊन आशीर्वाद देईल, असा त्याचा विश्वास आहे. पाकिस्तानी संघातील सर्व लोकांचा अल्लाहवर अधिक विश्वास असल्याचे अनेकदा दिसून आले आहे आणि सर्व सामन्यांनंतर खेळाडू अल्लाहचे आभार मानताना दिसतात.
आता पाकिस्तानी संघ १९९२च्या कहाणीची पुनरावृत्ती करू शकतो की इंग्लंड १९९२ चा बदला तीन दशकांनंतर पूर्ण करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे कारण इंग्लंडची फलंदाज हे अधिक निर्भयपणे फटके खेळण्यात माहीर आहेत, तिकडे पाकिस्तानच्या गोलंदाजीची ताकद सर्वांनाच माहीत आहे. जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजी ही पाकिस्तानची आहे असे मत स्वतः बाबर आझमने व्यक्त केले.