Shoaib Malik Criticizes Babar Azam : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत पाकिस्तानचा संघ पोहोचू शकला नाही. त्यामुळे पाकिस्तान संघ आणि बाबर आझम यांच्यावर चाहते आणि माजी खेळाडू बरीच टीका करत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकनेही बाबर आझमवर निशाणा साधला आहे. तो म्हणाला, बाबरच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला असता. शोएबचे मलिकचे हे वक्तव्य पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध ३ विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर आले आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मी बाबरच्या जागी असतो, तर राजीनामा दिला असता –

बाबर आझमच्या संदर्भात टेन स्पोर्ट्सशी बोलताना शोएब मलिक म्हणाला, “जर मी बाबरच्या जागी असतो, तर मी राजीनामा दिला असता आणि इथून मी माझ्या फलंदाजी आणि क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले असते. कारण हे माझ्यासोबतही असेच घडले होते. २००९-१० मध्ये मला पुन्हा कर्णधारपद देण्याची चर्चा होती पण मी ते स्वीकारले नाही.”

Saif Ali Khan House Help Video
हाताला पट्टी अन् कपड्यांवर रक्ताचे थेंब, सैफ अली खानबरोबर हल्ल्यात जखमी झालेल्या मदतनीसचा Video Viral
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
maha kumbha mela 2025 khoya paya kendra funny video
VIDEO : “ऐ राजू, हम ढूंढ रहे है रे बाबू…”, महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या लोकांसाठी होतायत अशा घोषणा की, ऐकून पोट धरून हसाल
kareena Kapoor video last night from recidence after the incident
Video: पतीवर झालेल्या हल्ल्याने करीना कपूर चिंतेत; घटनेनंतर घराबाहेरील पहिला व्हिडीओ आला समोर
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ

शोएब मलिक बाबर आझमवर संतापला –

शोएब मलिक पुढे म्हणाला की, “तेव्हा माझ्याकडे एकच कारण होतं की मला माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं होतं. यामुळेच मी पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याचा विचार केला नाही. बाबरने आता तेच करायला हवे. बघा, मी हे नुसते बोलत नाही, त्यांचे नंबरही तुमच्यासमोर आहेत. जर मी त्याच्या जागी असतो तर माझ्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी नक्कीच राजीनामा दिला असता.” दुसरीकडे बाबर आझमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर आपल्या कर्णधारपदाबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हा मी कर्णधारपद सोडले, तेव्हा मला वाटले की मी यापुढे कर्णधार राहू नये आणि मी स्वत: ते घोषित केले होते.

हेही वाचा – तौहीद हृदोयच्या विकेटनंतर नेपाळी चाहत्याच्या आनंदाला उरला नाही पारावार, स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्याचा VIDEO व्हायरल

दुसरीकडे बाबर आझमने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर आपल्या कर्णधारपदाबद्दल बोलताना सांगितले की, जेव्हा मी कर्णधारपद सोडले तेव्हा मला वाटले की मी यापुढे कर्णधार राहू नये आणि मी स्वत: ते जाहीर केले होते. यानंतर पीसीबीने पुन्हा माझ्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली, हा त्यांचा निर्णय होता. आता आपण परत जाऊ आणि येथे काय घडले यावर चर्चा करू. मी पुन्हा कर्णधारपद सोडले तर सर्वांना कळवीन. आत्तापर्यंत, मी याबद्दल विचार केलेला नाही आणि हा निर्णय पीसीबीला घ्यावा लागेल.”

Story img Loader