Swiggy and Zomato’s post about IND vs PAK match goes viral : टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तान सामना आतापासून काही तासांत सुरू होणार आहे. या सामन्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. भारतीय चाहते सोशल मीडियावर भारतीय संघाची ताकद आणि पाकिस्तानी संघाची कमजोरी यावर आपली मते मांडत आहेत. अशा परिस्थितीत अनेक युजर्स पाकिस्तानी चाहत्यांना डिवचताना दिसत आहेत. क्रिकेट चाहत्यांसोबतच आता झोमॅटो आणि स्विगी सारख्या कंपन्याही पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली उडवणाऱ्यांमध्ये सामील झाल्या आहेत. या कंपन्यांच्या पोस्ट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोमॅटोने घेतली पाकिस्तानची चाहत्यांची फिरकी –

झोमॅटोने आपल्या एक्स हँडलवरून एक पोस्टर ट्विट केले आहे. या पोस्टरमध्ये आज टॉप सेलरची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एका बाजूला भारताची यादी आहे, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची यादी आहे. झोमॅटोच्या या पोस्टरनुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी भारतीय लोक बिर्याणी, चहा आणि पिझ्झा यासारख्या वस्तू ऑर्डर करत आहेत. तर पाकिस्तानी चाहते टीव्ही ऑर्डर करत आहेत.

हेही वाचा – IND vs PAK Live, T20 World Cup 2024 : बाबर आझम-मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानच्या डावाला सावध सुरुवात

स्विगीने पीसीबी उडवली खिल्ली –

झोमॅटोप्रमाणे स्विगी इंस्टामार्टच्या अकाऊंटवरून एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये “हॅप्पी इडिया वि पाकिस्तान डे” या मथळ्यासह एक ट्विट आहे. या ट्विटमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत खात्यावर पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे की, “बोलो तो रेडबुल भिजवा दें एनर्जी के लिए? मैच के बाद टीवी उठा के फेंकना भी तो होगा.” या ट्विटवरुन भारतीय चाहते पाकिस्तानची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

२०२२ च्या शेवटच्या टी-२० विश्वचषकापासून भारतीय संघात किती बदल झाला?

ऑस्ट्रेलियात अखेरच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळालेल्या सात चेहऱ्यांना यावेळी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या वेळी ऋषभ पंतसोबत यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या दिनेश कार्तिक आणि केएल राहुलचा यावेळी संघात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे भारतीय संघात चार फिरकीपटूंना संधी मिळाली असली तरी संघाचा सर्वात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. राहुलप्रमाणेच अश्विनही मागच्या वेळी संघाचा भाग होता. राहुल आणि अश्विन व्यतिरिक्त दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा समावेश होता, ज्यांना यावेळी संधी मिळाली नाही. हे पाच खेळाडू 2024 च्या टी-20 विश्वचषक संघाचा भाग होते.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato blinkit and swiggy instamart messages post viral about india vs pakistan match in t20 world cup 2024 vbm