भारताचा सलामीवीर इशान किशनने १० क्रमांकांनी झेप घेत २३व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर दीपक हुड्डाने गुरुवारी जारी केलेल्या टी२० फलंदाजांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा टॉप-१०० मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळविला. पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर दोघांनीही चार्टमध्ये वरच्या दिशेने वाटचाल केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हुडाने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्यानंतर ४० क्रमांकांनी पुढे जात ९७ व्या स्थानावर पोहोचला आहे तर सलामीवीर किशनला क्रमवारीत ३७ धावांच्या शानदार खेळीचे बक्षीस मिळाले. मुंबईत दुर्मिळरित्या अपयशी ठरल्यानंतरही धडाकेबाज सूर्यकुमार यादवने फलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले. भारताचा नवा टी२० कर्णधार हार्दिक पंड्या, गोलंदाजांमध्ये नऊ क्रमांकांनी पुढे जात ७६ व्या स्थानावर आहे.

हेही वाचा: Asia Cup: टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? आशिया कपसाठी एकाच गटात समावेश, जय शाहांनी जाहीर केलं २०२३चे कॅलेंडर

जोपर्यंत श्रीलंकेचा संबंध आहे, वानिंदू हसरंगा पुन्हा एकदा भारताविरुद्ध २२ धावा देत १ गडी बाद करणारा महत्त्वाचा योगदानकर्ता होता. हसरंगानेही फलंदाजीतही झटपट २१ धावा केल्या आणि त्यामुळे २५ वर्षीय हसरंगा अष्टपैलू खेळाडूंच्या नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत दोन क्रमांकांनी पुढे जात पाचव्या स्थानावर पोहोचला.

फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही मार्नस लॅबुशेनने चांगली आघाडी घेताली आहे. तथापि, त्याचे सर्वात जवळचे प्रतिस्पर्धी, सहकारी स्टीव्ह स्मिथ, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन हे सर्व २८ वर्षीय लॅबुशेनच्या जवळ आहेत.

हेही वाचा: FIH Men’s Hockey WC 2023: १२०० कामगार, २४x७ शिफ्ट, शेकडो कोटींचा खर्च! जगातील सर्वात मोठे राउरकेला स्टेडीयम हॉकी वर्ल्ड कपसाठी सज्ज

विल्यमसन हा नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत दुसरा मोठा विजेता आहे आणि दोन क्रमांकांनी झेप घेतली आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याच्या कारकिर्दीतील पाचव्या द्विशतकानंतर तो सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीमध्ये, पॅट कमिन्सने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या विजयादरम्यान फक्त एक बळी मिळवला, परंतु तरीही इंग्लंडच्या अनुभवी जेम्स अँडरसनवर ३७ गुणांची आघाडी घेत अव्वल स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20i ranking ishan kishan leaps forward in icc rankings to 23rd number deepak hooda enters top 100 again avw