न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताला २-१ अशी हार पत्करावी लागली. मात्र या सामन्यात आपली चमक दाखवणाऱ्या फिरकीपटू कुलदीप यादवला त्याच्या कामगिरीचे फळ मिळाले. ICC ने जाहीर केलेल्या ताज्या टी २० क्रमवारीनुसार कुलदीप यादवला एक स्थानाची बढती मिळाली असून तो दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या टी २० सामन्यात न्यूझीलंडचे सलामीवीर सिफर्ट आणि मुनरो या दोघांनाही त्याने तंबूचा रस्ता दाखवला. त्याने २६ धावांत २ बळी टिपत चांगली कमाहगिरी केली. त्यामुळे त्याला आपल्या टी २० कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी मिळाली आहे. या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रशीद खान याच्यापेक्षा कुलदीप ६५ गुणांनी मागे आहे.

याशिवाय, अष्टपैलू फिरकीपटू कृणाल पांड्याला क्रमवारीत ३९ गुणांची बढती मिळाली असून तो कारकिर्दीतील सर्वोत्तम ५८व्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनाही क्रमवारीत बढती मिळाली आहे. रोहित शर्मा आपल्या चांगल्या कामगिरीच्या बळावर १०व्या स्थानावरून ३ स्थाने वर सरकून ७व्या स्थानी पोहोचला आहे. तर शिखर धवनदेखील या यादीत १ स्थान वर सरकून ११व्या स्थानी आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील पराभवामुळे भारतीय संघाच्या गुणांमध्ये घट झाली आहे. भारताचे २ गुण कमी झाले असून सध्या भारत १२४ गुणांवर आहे. तर पाकिस्तानला आफ्रिकेकडून प्रभाव पत्करावा लागला असल्याने पाकिस्तानचेही ३ गुण घातले आहेत. परंतु दोनही संघाच्या क्रमवारीत फरक पडलेला नसून पाकिस्तान आणि भारत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.