ICC latest test batter ranking announced Virat Kohli out of top ten : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना २८० धावांनी जिंकला होता. या सामन्यात रोहित शर्मा किंवा विराट कोहली दोघांनीही फलंदाजी केली नाही. आता या दोघांना आयसीसी कसोटी क्रमवारीतही याचे परिणाम भोगावे लागले आहेत. एकीकडे विराट कोहली टॉप १० मधून बाहेर पडला आहे, तर रोहित शर्मा दहाव्या स्थानावर घसरला आहे. मात्र, भारताचा इतर फलंदाजांना क्रमवारीत फायदा झाला आहे.

जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम –

आयसीसी कसोटी क्रमवारीत टॉप-४ मध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या ८९९ आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ८५२ आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ७६० रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. स्टीव्ह स्मिथने ७५७ रेटिंगसह चौथे स्थानावर कायम आहे.

यशस्वी-ऋषभला झाला फायदा –

या क्रमवारीत टॉप-४ नंतर भारताची यशस्वी जैस्वाल आता एका स्थानाने पुढे सरकत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७५१ पॉइंट झाले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतक झळकावले, त्याचा फायदा त्याला झाला आहे. तर भारताचा ऋषभ पंत ७३१ रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावले.

हेही वाचा – ‘…षटकारांची भीती वाटत नाही’, ऋषभ पंतबद्दल बोलताना नॅथन लॉयन काय म्हणाला?

मोहम्मद रिझवानलाही झाला फायदा –

उस्मान ख्वाजालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७२८ रेटिंगसह ७व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७२० च्या रेटिंग पॉइंटसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मार्नस लॅबुशेन देखील आठव्या क्रमांकावर संयुक्त आहे, कारण त्याचेही रेटिंग पॉइंट ७२० आहेत.

हेही वाचा – VIDEO : अश्विनने भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांबद्दल सांगितला मजेशीर किस्सा; म्हणाला, ‘इंटरनेटवर जेव्हा त्यांचे नाव सर्च केले…’

विराट टॉप-१० मधून बाहेर, रोहित दहाव्या स्थानावर घसरला –

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला एका झटक्यात ५ स्थानांचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग पॉइंट आता ७१६ पर्यंत घसरले असून तो थेट दहाव्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीलाही तेवढ्याचा स्थानांचा फटका बसला आहे. मात्र, टॉप-१० फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तो आता ७०९ च्या रेटिंग पॉइंटसह १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम त्याच्या पुढे आहे. त्याचे रेटिंग ७१२ आहेत. सध्या तो ११ व्या स्थानावर आहे. दरम्यान, शुभमन गिललाही थोडा फायदा झाला आहे. तो ७०१ रेटिंगसह ५ स्थानांनी झेप घेत १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.