बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० असा विजय मिळवला. इंदूर आणि कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी भारतीय संघाने डावाने जिंकली. भारतीय गोलंदाजांनी या मालिकेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विशेषकरुन इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशी गोलंदाजांची भंबेरी उडवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिरकीपटू रविचंद्रन आश्विननेही या मालिकेच चांगला मारा केला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत त्याला या कामगिरीचा फायदा झालेला असून, तो नवव्या क्रमांकावर आला आहे.

दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर असलेला जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरला आहे. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळेल. यानंतर २०२० साली भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

अवश्य वाचा – ICC Test Ranking – मयांक अग्रवाल TOP 10 मध्ये दाखल