आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. आतापर्यंत जो रूट फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता, मात्र आता बऱ्याच काळानंतर रूट क्रमवारीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. तर ट्रॅव्हिस हेड, कामेंदू मेंडिस, टेम्बा बावुमा यांना यावेळी मोठा फायदा होताना दिसत आहे. यावेळी टॉप १० यादीत अनेक मोठे बदल स्पष्टपणे दिसत आहेत. तर भारतीय फलंदाजांना धक्का बसला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक आता अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. ब्रुकने जो रूटला मागे टाकत आयसीसी कसोट क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. यापूर्वी तो दुसऱ्या क्रमांकावर होता. आता त्याचे रेटिंग ८९८ गुणांवर पोहोचले आहे. जो रूट दुसऱ्या स्थानी गेला असून त्याचे रेटिंग ब्रुकपेक्षा एका गुणाने म्हणजेच ८९७ आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८१२ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि भारताचा यशस्वी जैस्वाल ८११ रेटिंगसह चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार शतक झळकावल्याचा फायदा ट्रॅव्हिस हेडला झाला आहे. त्याने एकाचवेळी ६ स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता ७८१ च्या रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. श्रीलंकेच्या कामेंदू मेंडिसलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७५९ च्या रेटिंगसह ६व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार टेम्बा बावुमालाही तीन स्थानांचा फायदा होताना झाला आहे. तो आता ७५३ च्या रेटिंगसह ७व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरम्यान, झीलंडच्या डॅरिल मिचेलला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आता ७२९ रेटिंगसह ८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या ऋषभ पंतलाही फटका बसला असून तो आता ७२४ च्या रेटिंगसह ९व्या क्रमांकावर घसरला आहे. पंत ३ स्थानांनी घसरला आहे. पाकिस्तानच्या सौद शकीलचेही रेटिंग ७२४ आहे, त्यामुळे तो पंतसह संयुक्तपणे नवव्या क्रमांकावर आहे.

भारताच्या विराट कोहलीला ६ स्थानांचा फटका बसला असून तो २० व्या क्रमांकावर घसरला आहे. तर शुबमन गिल ६७२ रेटिंगसह १७व्या स्थानी आहे. रोहित शर्मा कप ५९५ रेटिंगसह ३१व्या स्थानी आहे.

Story img Loader