ICC Test Rankings Jasprit Bumrah Yashasvi Jaiswal: भारत वि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या कसोटीनंतर आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या क्रमांकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा नंबर १ कसोटी गोलंदाज ठरला आहे. पर्थ कसोटीत चमकदार कामगिरी करत त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला मागे टाकलं आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या २९५ धावांनी दणदणीत विजय मिळवताना बुमराहने आठ विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

बुमराहने या कामगिरीच्या जोरावर कसोटी क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांना मागे टाकून कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज म्हणून आपले स्थान पुन्हा मिळवले.

हेही वाचा – Fastest T20I Century: IPL लिलावात Unsold अन् आता २८ चेंडूत शतक! ‘या’ खेळाडूने मोडला ऋषभ पंतचा मोठा विक्रम

इंग्लंडविरुद्ध या वर्षी फेब्रुवारीमध्ये नऊ विकेट घेत बुमराहने प्रथमच अव्वल स्थान गाठले आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने पुन्हा अव्वल स्थान गाठले. मात्र यानंतर रबाडाने त्याला मागे टाकलं होतं. बुमराहशिवाय त्याचा मोहम्मद सिराजनेही क्रमवारीत सुधारणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. ज्याच्या जोरावर त्याने तीन स्थानांची सुधारणा करत २५वे स्थान गाठले आहे.

यशस्वी जैस्वालची कारकीर्दीतील सर्वात्कृष्ट रँकिंग

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली आहे. यशस्वी जैस्वालने पर्थ कसोटीतील शतकानंतर आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी जो रूट ९०३ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर १६१ धावांच्या खेळीनंतर ८२५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यशस्वी जैस्वालच्या छोट्याश्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी रँकिंग मिळवली आहे.

हेही वाचा – Rishabh Pant: ऋषभ पंतने पैसे नाही तर ‘या’ कारणामुळे दिल्लीची सोडली साथ, संघमालक पार्थ जिंदाल यांनी केला मोठा खुलासा

 ICC Test Batting Rankings
ICC Test Batting Rankings

यशस्वी जैस्वाल दुसऱ्या स्थानी गेल्याने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला एका स्थानाचा तोटा झाला आहे. तो आता ८०४ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा हॅरी ब्रुक तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

कसोटी फलंदाजांच्या यादीत विराटला एका शतकासह ९ स्थानांनी झेप घेतली आहे. विराट कोहली आता ६८९ गुणांसह १३व्या स्थानी पोहोचला आहे. ऋषभ पंत या क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे, पंतने आपले सहावे स्थान कायम राखले आहे.