ICC Test Ranking : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत १२ स्थानांची झेप घेत १६व्या स्थानी विराजमान झाला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने सामन्यात ८३ धावा देऊन ९ बळी टिपले. त्याने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले. क्रमवारीत ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

 

बुमराहशिवाय सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा आणि दुसऱ्या डावात ६ बळी टिपणारा पॅट कमिन्स यानेही चांगल्या कामगिरीच्या जोरावर तिसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. त्यालादेखील प्रथमच टॉप५ मध्ये स्थान मिळाले आहे.

फलंदाजांच्या यादीत टॉप १०मध्ये फारसा फरक पडलेला नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली हा अद्याप या यादीत ९३१ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ पंत १० स्थानाच्या बढतीसह ३८व्या तर रोहित शर्मा ११ स्थानाच्या बढतीसह ४४ व्या स्थानावर पोहोचले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा एक स्थान घरून तिसऱ्या स्थानी गेला आहे. पण टीम इंडिया मात्र कसोटी क्रमवारीत ११६ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.

Story img Loader