ICC Test Rankings: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताच्या दारूण पराभवानंतर आयसीसीने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला थोडा फायदा झाला आहे. तर यशस्वी जैस्वालला धक्का बसला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही स्टार खेळाडूंना मात्र तगडा फटका बसला आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग ९०३ आहे. तर केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग ८०४ आहे. म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यांच्यात फरक बराच मोठा आहे. यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता ७७८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात दिसणार ४२ वर्षीय खेळाडू, १५ वर्षांपूर्वी खेळला होता अखेरचा टी-२० सामना; ‘या’ संघाचा आहे गोलंदाजी कोच

यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत काही विशेष करू शकला नाही, त्यामुळेच तो आता एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे, त्याचे रेटिंग आता ७७७ आहे. स्टीव्ह स्मिथ अजूनही ७५७ च्या रेटिंगसह ५व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतने मुंबई कसोटीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती, त्याचाच फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. त्याने आता पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७५० झाले आहे. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज टॉप १० मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.

हेही वाचा – IPL Auction 2025: आयपीएल लिलावात पहिल्यांदाच या देशाच्या खेळाडूचा सहभाग; मुंबई इंडियन्सशी आहे खास कनेक्शन

ICC Test Batting Rankings
ICC Test Batting Rankings

विराट कोहली ८ स्थानानी खाली गेला आहे. त्याचे रेटिंग ६५५ पर्यंत घसरले असून तो २२व्या क्रमांकावर आहे. सततच्या खराब खेळाचा परिणाम या क्रमवारीत दिसून येत आहे. रोहित शर्मा तर तो थेट २६ व्या क्रमांकावर गेला आहे. त्याला दोन स्थानांचा फटका बसला आहे. त्याचे रेटिंग सध्या ६२९ आहे. याचाच अर्थ आता या दोघांनाही टॉप 10 मध्ये परतणे खूप कठीण जाणार आहे.