टीम इंडियाने २०१९ या वर्षाचा शेवट गोड केला. वेस्ट इंडिज विरूद्ध टी २० आणि एकदिवसीय मालिकेत भारताने विजय मिळवला. तर त्या आधी खेळलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेत भारताने बांगलादेशला २-०ने धूळ चारली. कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने ती कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे यंदाच्या वर्षातील ICC च्या शेवटच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. पण चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झाली आहे.

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड हे दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने संपल्यानंतर ICC ने नवीन क्रमवारी जाहीर केली. त्यात विराट कोहलीने ९२८ गुणांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. पण चेतेश्वर पुजाराची एका स्थानाने घसरण होऊन तो ७९१ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबूशेनने त्याची जागा घेतली आहे. तो ८०५ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. याशिवाय आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने दमदार कामगिरीच्या जोरावर टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. तो ८ स्थानांची झेप घेत ७१२ गुणांसह १० व्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तरित्या सातव्या स्थानी आहे. या दोघांचे ७५९ गुण आहेत.

Team of Decade : पॉन्टिंगच्या कसोटी संघात चार कर्णधार, भारताचे ‘एवढे’ खेळाडू

IPL 2020 च्या महागड्या खेळाडूचा पराक्रम; कपिल देव, मॅकग्रा यांच्या पंगतीत स्थान

गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिन्स अव्वलस्थानी कायम आहे. जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानी अढळ आहे. आनंदाची बाब म्हणजे रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी दोघेही दोन स्थानांची उडी घेत टॉप १० मध्ये आले आहेत. अश्विन ७७२ गुणांसह नवव्या आणि शमी ७७१ गुणांसह दहाव्या स्थानी विराजमान झाले आहेत.

Wisden T20 team of decade : टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंना संधी

“हिंदू-मुस्लीम वाद पाकिस्तानातच, आम्ही तर अझरूद्दीनला कर्णधार केलं होतं”

२०२० साली भारताची पहिला कसोटी मालिका न्यूझीलंड दौऱ्यापासून होणार आहे. या दौऱ्यावर भारत २ कसोटी सामने खेळणार आहे.