ICCच्या कसोटी क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ICCने नुकतीच कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने ९३५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तसेच भारतीय संघानेही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विनची घसरण झाली आहे.
भारताने कसोटी मालिकेत आठव्या स्थानावरील विंडीजला २-० असे सहज पराभूत केले होते. यात विराटने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याचे अव्वल स्थान अबाधित राहिले आहे. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आॅस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टीव्ह स्मिथपेक्षा (९१०) २५ गुणांनी आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सनपेक्षा (८४७) ८८ गुणांनी पुढे आहे.
गोलंदाजीच्या क्रमवारीत पाःजिल्या १० स्थानाच्या यादीत फारसा फरक पडलेला नाही. भारताचा रवींद्र जाडेजा ८१२ गुणांसह ५ व्या स्थानी तर आर अश्विन ७७७ गुणांसह नवव्या स्थानी कायम आहे. केवळ आपली शेवटची कसोटी खेळलेला रंगना हेराथ १ स्थान घसरून ८व्या स्थानी निवृत्त झाला आहे. तसेच या क्रमवारीत भारतीय संघानेही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या द.आफ्रिकेपेक्षा (१०६) भारत ११६ गुणांसह १० गुणांनी पुढे आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अश्विनला १ स्थान खाली ढकलून ५व्या स्थानी जागा मिळवली आहे. त्यामुळे अश्विन आता ६व्या स्थानी आहे.