कसोटी क्रिकेट सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. वर्षानुवर्षे क्रिकेट विश्वात पाच दिवसाचा कसोटी क्रिकेट सामना खेळला जातो आहे. मात्र लवकरच आंतरराष्ट्रीय कसोटी सामने हे चार दिवसांचे करण्याचा विचार ICC करत आहे. प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे.

मुलगी आरती करते, म्हणून टीव्हीच फोडून टाकला – शाहिद आफ्रिदी

गेल्या काही वर्षात टी २० क्रिकेटची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. पुढील काही वर्षांमध्ये टी २० क्रिकेट खूप वाढणार आहे. तसेच सध्या क्रिकेटचा वाढता वेग पाहता बरेच कसोटी सामने चार दिवसांमध्येच संपत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेट दुर्लक्षित राहू नये, म्हणून ICC चार दिवसांचा कसोटी सामना खेळवण्याचा विचार करत आहे. सुरुवातीच्या काळात कसोटी सामना हा सहा दिवसांचा असायचा. त्यापूर्वी कसोटी सामन्यांमध्ये एक दिवस विश्रांतीसाठी राखीव ठेवलेला असायचा. त्यानंतर कसोटी सामना ६ दिवसांऐवजी पाच दिवसांचा करण्यात आला. आता कसोटी सामना ५ दिवसांऐवजी चार दिवसांचा करण्याचा विचार ICC कडून केला जात आहे.

ICC Test Rankings : कोहली ‘किंग’; अश्विन, शमीची ‘टॉप १०’ मध्ये उडी

ICC ने या निर्णयाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मत मागवली जाणार आहेत.

Story img Loader