सिडनी : कसोटी क्रिकेटचे भविष्य टिकवण्यासाठी किमान १.५ कोटी अमेरिकन डॉलरचा निधी राखीव ठेवण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) विचार आहे. यामुळे खेळाडूंच्या सामन्याचे मानधन वाढविण्यास मदत मिळेल आणि खेळाडूंना ट्वेन्टी-२० लीगवर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखले जाऊ शकेल, असा अंदाज आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला असून त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा, तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा (ईसीबी) पाठिंबा मिळाला आहे. या निधीच्या माध्यमातून क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ होईल आणि संघाला परदेश दौऱ्यांवर पाठवण्याचा खर्चही यामधून निघू शकेल. अशा निधीमुळे वेस्ट इंडिजसारख्या क्रिकेट मंडळांना मदत मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या मंडळातील खेळाडू कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवून जगभरातील ट्वेन्टी-२० लीग खेळण्यास प्राधान्य देतात.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर

हेही वाचा >>>Rahul Dravid: “जास्त पैसे मिळाले तर…” बायोपिकमध्ये कोणता अभिनेता तुमची भूमिका चांगली साकारेल? राहुल द्रविडने दिलं भन्नाट उत्तर

‘‘हा निधी जमा झाल्यानंतर सर्व खेळाडूंना कमीत कमी मानधन सुनिश्चित होईल, जे जवळपास दहा हजार डॉलर असेल. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही भागेल,’’ असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.