श्रीलंका आणि पाकिस्तान (SL vs PAK) यांच्यात जुलैमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील तिसरा सामना पाकिस्तान संघाने जिंकला होता. ज्यामध्ये त्यांनी चौथ्या दिवशी ३४२ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि विजय मिळवला. या सामन्यावर आता फिक्सिंगचे आरोप झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) सामन्यावरील फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करणार आहे.
श्रीलंका क्रिकेट (SLC) बोर्डाने चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे आणि भ्रष्टाचार विरोधी युनिटला या प्रकरणात आमंत्रित केले आहे. श्रीलंकेचे खासदार नलिन बंडारा यांनी या सामन्यावर शंका उपस्थित करत फिक्सिंगचे आरोप केले होते. त्यामुळे घरच्या संघाकडून खराब कामगिरीचा धक्कादायक आरोप होत आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर, एसएलसी ने एसीयू प्रमुखांना जागतिक संस्थेमध्ये आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. सध्या आयसीसी भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांवर भाष्य करणार नाही. परंतु तपासासाठी एसीयू अधिकारी पाठवेल.
श्रीलंकेच्या संसदेतील खासदार नलिन बंडारा म्हणाले की, श्रीलंका क्रिकेट बोर्डातील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या भ्रष्टाचाराने वेढला गेला होता. त्यामुळे या सामन्याच्या निकालात फरक पडला. क्रिकबझने खासदाराला या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “काही प्रॉब्लेम सुरू आहे, त्याबद्दल उद्या बोलू.” वृत्तानुसार, या मॅच फिक्सिंगबाबत त्यांनी अद्याप कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत, मात्र संसदेत हे प्रकरण उपस्थित करून त्यांनी क्रिकेटला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे.
या वर्षी जुलैमध्ये झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिले होते. मात्र अखेरच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने ३४२ धावांचे अवघड लक्ष्य गाठले.