ICC ने महिला टी-२० विश्वचषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. बांगलादेशच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाईल. यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ असतील, ज्यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण २३ सामने १९ दिवसात खेळवले जाणार आहेत. सर्व १० संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला प्रत्येक गटात ४-४ सामने खेळावे लागतील. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर चार संघांमध्ये प्लेऑफची लढत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला टी-२० वर्ल्डकप हा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने ढाका आणि सिल्हेट येथे खेळवले जातील. तर उपांत्य फेरीचे सामने १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना खेळवला जाईल. टीम इंडियाच्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर १ संघ आहेत. टीम इंडियाचा सामना ६ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.

टी-२० विश्वचषक २०२४ मधील गट-
अ गट: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर १

ब गट: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश

भारताचे महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक

४ ऑक्टोबर – भारत विरूद्ध न्यूझीलंड – सिल्हेट
६ ऑक्टोबर – भारत विरूद्ध पाकिस्तान – सिल्हेट
९ ऑक्टोबर – भारत विरूद्ध क्वालिफायर १ – सिल्हेट
१३ ऑक्टोबर – भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया – सिल्हेट

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc womens t20 world cup 2024 schedule announced ind vs pak match on 6 october read details in marathi bdg