ICC Women’s World Cup 2024 Live Streaming: ICC महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला आजपासून ३ ऑक्टोबरपासून युएईमध्ये सुरूवात होत आहे. तर भारताचा पाहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. १८ दिवस चालणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत १० संघांमध्ये २३ सामने होणार आहेत. तर २० ऑक्टोबर रोजी महिला टी-२० विश्वचषकाचा नवा चॅम्पियन मिळणार आहे. भारतात हे सामने कधी आणि कुठे पाहता येतील ते जाणून घेऊया.

महिला टी-20 विश्वचषक युनायटेड अरब अमिरातीमध्ये खेळवला जात असला तरी यापूर्वी या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला मिळणार होते. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांच्या आंदोलने झाली. त्यामुळे सत्तापरिवर्तन झाले पण राजकीय अस्थिरता कायम राहिली. अराजकाचे वातावरणही संपले नाही. याच कारणामुळे टी-२० विश्वचषकाचे ठिकाण बदलण्यात आले. सर्वच संघ युएईमध्ये पोहोचले असून संघांनी सराव सामनेही खेळले आहेत.

हेही वाचा – VIDEO: “माझं डोकं फोडायच्या तयारीत आहेस का…”, अनुष्का शर्माने विराटला टाकला भयानक बाऊन्सर; थोडक्यात वाचला कोहली

महिला टी-२० वर्ल्डकपमधील १० संघांना दोन गटात विभागले गेले आहे. पहिल्या अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत. तर दुसऱ्या ब गटात बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ आहेत.

Women’s T20 World Cup: India’s Fixtures – महिला टी-२० विश्वचषकासाठी भारताचं वेळापत्रक

भारत वि न्यूझीलंड – ४ ऑक्टोबर, ७.३० वा
भारत वि पाकिस्तान – ६ ऑक्टोबर ३.३० वा.
भारत वि श्रीलंका – ९ ऑक्टोबर, ७.३० वा.
भारत वि ऑस्ट्रेलिया – १३ ऑक्टोबर, ७.३० वा.

हेही वाचा – IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO

महिला टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधारक), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया (फिटनेसवर आधारित), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील (फिटनेसवर आधारित), सजना सजीवन

राखीव: उमा चेत्री (यष्टीरक्षत), तनुजा कंवर, सायमा ठाकोर

नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व: राघवी बिस्त, प्रिया मिश्रा

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

  • ICC महिला T20 विश्वचषकाचा पहिला सामना कधी आणि कोणाविरूद्ध होणार आहे?

ICC महिला टी-२० विश्वचषकाचा पहिला सामना ३ ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता खेळवला जाईल. हा सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.

  • ICC महिला T20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना कधी होणार आहे?

महिला टी-२० विश्वचषकात भारताचा पहिला सामना ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

  • महिला T20 विश्वचषक सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

महिला T20 विश्वचषक भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

  • महिला T20 विश्वचषक २०२४ चे लाइव्ह स्ट्रीमिंग कोणत्या अॅपवर पाहता येणार?

Disney+ Hotstar वर महिला टी-२० विश्वचषक २०२४ चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

c