पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने बाबर आझमला विराट कोहलीसारखं व्हायचं असेल तर काय करावं लागले याबद्दलचा सल्ला दिला आहे. विराटला आदर्श मानणाऱ्या बाबरने विराटचा खेळ पाहून डावाला आकार कसा द्यावा हे शिकवे असे अख्तर म्हणाला आहे. बाबरने योग्य सुरुवात केल्यानंतर सामन्यातील परिस्थितीनुसार कसे खेळावे हे विराटकडून शिकायला हवे अशी अपेक्षा बाबारकडून व्यक्त केली आहे.
‘बाबार आझामला मी इतकचं सांगू इच्छितो की, जर तू कोहलीला तुझा आदर्श मानत असशील तर तू त्याच्यासारखं खेळायला शिकलं पाहिजे. कठीण परिस्थितीमध्येही विराट धावा करतो. विराटप्रमाणे एकेरी-दुहेरी धावा घेण्याचे कौशल्य बाबारने शिकायला हवे. समोरची परिस्थिती आपल्या कौशल्याने हाताळण्यास बाबारने शिकायला हवे,’ अशी अपेक्षा अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे.
‘जर तुम्ही विराट कोहली, रोहित शर्मा आणि केन विल्यमसन सारख्या खेळाडूंकडे पाहिले तर हे खेळाडू अर्धशतक झाल्यानंतर धावगती वाढवतात. बाबरने ही गोष्ट त्यांच्याकडून शिकायला हवी. त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे फटके मारायला शिकले पाहिजे’ असे मत बाबरने व्यक्त केले आहे. एकीकडे बाबारला सुधारण्याचा सल्ला देतानाच अख्तरने हॅरीस सोहेलचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये ५९ चेंडूत ८९ धावांची खेळी हॅरीसने केली होती. याच सामन्यात बाबरने ८० चेंडूमध्ये ६९ धावा केल्या होत्या. या सामन्याबद्दल बोलताना अख्तर म्हणतो, ‘हॅरीस सोहेलचा अंतीम ११ खेळाडूंमध्ये समावेश करायला हवा हे मी आधीपासूनच सांगत होतो कारण तो खूप संतुलित खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये धावा कशा कराव्यात हे सोहेलने दाखवून दिले. या सामन्यात त्याने बाबारपेक्षा छान खेळ केला. या सामन्यामध्ये सोहेलच्या खेळीमुळे पाकिस्तानला ३०० हून अधिक धावा करता आल्या. शोएब मल्लिकला विश्रांती देऊन सोहेलला संधी देण्याचा निर्णय योग्य होता.’
पाकिस्तानची गोलंदाजी चांगली असून त्यांनी क्षेत्ररक्षणावर विशेष लक्ष्य द्यायला हवे असा सल्लाही अख्तरने पाकिस्तानी संघाला दिला आहे.