इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने इंग्लंडमध्ये दोन सराव सामन्यांपैकी एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी बसमधून प्रवासादरम्यान टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने, संघाच्या सपोर्ट स्टाफला आपल्या ‘चहल टीव्ही’ या कार्यक्रमात बोलतं केलं आहे.

चहलने या व्हिडीओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, फिजीओ पॅट्रीक फराहत यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी गप्पा मारताना चहलने त्यांना विश्वचषकाच्या आठवणींबद्दल बोलतं केलं. यावेळी झालेल्या गप्पांमध्ये रवी शास्त्रींनी अभी तो मै जवान हूं, असा गमतीशीर डायलॉग मारला आहे. बीसीसीआयने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे.

बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात भारताकडून महेंद्रसिंह धोनी आणि लोकेश राहुल यांनी शतकं झळकावली. लोकेश राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत शतक झळकावलं, त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

Story img Loader