भारताचा सलामवीरी रोहित शर्मा सध्या चांगल्याच फॉर्मात आहेत. विश्वचषक स्पर्धेत रोहितने सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्यात शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क चांगलाच प्रभावित झाला आहे. रोहित वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीवीर असल्याचं प्रशस्तीपत्रक क्लार्कने दिलं आहे.

“रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. कदाचीत या प्रकारात त्याची कामगिरी फारशी चांगली होत नसेल. पण भारतीय संघातलं त्याचं महत्व त्याने अधोरेखित केलं आहे. तो भारतीय संघाचा उप-कर्णधार आहे, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्याने केलेली खेळी ही अविश्वसनीय होती. माझ्या मते वन-डे क्रिकेटमध्ये रोहित हा सर्वोत्तम सलामीवीर आहे.” क्लार्क इंडिया टुडे वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : भारतीय संघाला धक्का, शिखर धवन स्पर्धेमधून बाहेर

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रोहितने ३४ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानच्या सर्व गोलंदाजांवर हल्लाबोल करत रोहितने मँचेस्टरच्या मैदानात चौफेर फटकेबाजी केली. आपला नेहमीचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर असताना रोहितने लोकेश राहुलसोबत भक्कम सुरुवात करुन देत शतकी भागीदारीचीही नोंद केली. त्यामुळे आगामी सामन्यात रोहितची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video : Show must Go On ! शिखर धवनने मानले चाहत्यांचे आभार

Story img Loader