ब्रिस्टल : विश्वचषकात सर्वप्रथम पाचशे धावांचा पल्ला गाठण्याची क्षमता वेस्ट इंडिजमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया यष्टीरक्षक फलंदाज शाय होपने व्यक्त केली. ‘‘विंडीजच्या संघातील फलंदाजांमध्ये नक्कीच पाचशे धावांचा टप्पा गाठण्याची कुवत आहे. न्यूझीलंडकडे दर्जेदार गोलंदाज  असतानाही आम्ही ४२० धावा केल्या. त्यामुळे या विश्वचषकात किमान एका तरी सामन्यात आम्ही ५०० धावांचा डोंगर निश्चितच उभारू,’’ असे न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या होपने सांगितले.

ख्रिस गेल, आंद्रे रसेल, एव्हिन लेविस यांसारख्या अनेक धडाकेबाज फलंदाजांचा समावेश ही  वेस्ट इंडिजची जमेची बाजू आहे. प्रत्येक संघाने नेहमी आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करून त्यानुसार संघाची बांधणी करावी, असे मला वाटते.

-डॅरेन गंगा, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू