अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन आता आठवडाभराहूनही अधिक कालावधी झाला असला, तरी या स्पर्धेबाबत तितकीशी उत्सुकता पाहायला मिळालेली नाही. परंतु भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आज, शनिवारी अहमदाबाद येथील एक लाख ३२ हजार आसनसंख्या असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरताच या स्पर्धेबाबतचा उत्साह शिगेला पोहोचणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> NZ vs BAN, World Cup 2023: न्यूझीलंडने साधली विजयाची हॅट्ट्रिक! बांगलादेशवर ८ विकेट्सने केली मात, विल्यमसन-मिशेलने झळकावली अर्धशतकं

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

हा सामना याची देही, याची डोळा पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी अहमदाबादकडे कूच केले आहे. मुंबईकडून अहमदाबादकडे सर्वच रेल्वेगाडय़ा चाहत्यांची भरगच्च पहायला मिळाल्या. या सामन्यात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण अहमदाबाद भारत-पाक सामन्याने रंगून गेले आहे. काही दिवसांपूर्वी सामन्यात घातपात घडवून आणण्याबाबत ई-मेल आला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण स्टेडियम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह सामना पाहण्यासाठी अनेक नामांकितांची उपस्थिती अपेक्षित असल्याने चोख तपासणीनंतरच सर्वांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे. सामन्यापूर्वी १२.४० वाजल्यापासून सिनेसृष्टीतील कलावंतांचे सादरीकरण होणार आहे. अहमदाबाद येथील हॉटेल, लॉज यासह मिळेल त्या ठिकाणी चाहते राहण्याची व्यवस्था करत आहेत. राहण्याच्या सोयीसाठी चाहत्यांना दुप्पट रक्कम मोजावी लागत आहे.