ICC World Cup 2023 Anthem: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, आयसीसीने या मोठ्या इव्हेंटचे अधिकृत गीत ‘दिल जश्न बोले’ जारी केले आहे. हे राष्ट्रगीत प्रख्यात बॉलिवूड संगीतकार प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगची उपस्थिती आकर्षणात भर घालत आहे. तसेच, यात भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा देखील डान्स करताना दिसत आहे.
या गाण्यात प्रीतम आणि रणवीर सिंगची जोडी मस्ती करताना दिसत आहे. आयसीसीने शेअर केलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३साठीच्या अँथम गाण्यातील व्हिडिओमध्ये रणवीर सिंग निळा शर्ट, मरून रंगाचा ब्लेझर आणि मॅचिंग टोपी घातलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये चाहते सर्व १० देशांची जर्सी घातलेले दिसत आहेत.
व्हिडीओच्या सुरुवातीला रणवीर सिंग एका ट्रेनमध्ये दिसत आहे, जिथे तो एका मुलाला विचारतो, “बेटा, क्रिकेटचा तू फॅन नाहीस का?” यानंतर तो मुलगा विचारतो की, “फॅन म्हणजे काय?” संपूर्ण अँथम ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये युजवेंद्र चहलची पत्नी देखील नाचताना दिसत आहे. रणवीर सिंग आणि प्रीतम ट्रेनच्या छतावर डान्स करताना दिसत आहेत. माहितीसाठी, भारताचा रिस्ट लेग स्पिनर चहलची विश्वचषक २०२३साठी निवड करण्यात आलेली नाही. मात्र, तो जरी या विश्वचषकाचा भाग होऊ शकला नसला तरी त्याची पत्नी या गाण्याच्या माध्यमातून झाली आहे.”
एकदिवसीय विश्वचषक २०२३ला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून त्याचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. आशिया चषक २०२३चे विजेतेपद पटकावल्यानंतर १२ वर्षांनी मायदेशात होणारा विश्वचषक जिंकण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल. १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील पाच सामने खेळणार आहे.
विश्वचषकासाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.