क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पाच दिवस आधी येथील एक्रिडिटेशन सेंटरमधून महत्त्वाची माहिती असलेले पाच लॅपटॉप चोरीला गेले. शनिवारी रात्री हेगले नेटबॉल सेंटरमध्ये ही चोरी झाल्याची माहिती कँटबेरी स्टेटचे कमांडर सुप्रिटेंडंट गॅरी नॉल्स यांनी दिली. या चोरीचा विश्वचषकाच्या तयारीवर परिणाम होणार नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले. एका स्थानिक संकेतस्थळाशी बोलताना गॅरी म्हणाले, लॅपटॉपमध्ये कोणतीही वैयक्तिक माहिती नसल्याचे आयसीसीचे म्हणणे असून, क्रिकेट विश्वचषक २०१५ च्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. क्रिकेट सामन्यांना धोका निर्माण होईल, अशी कोणतीही माहिती चोरीला गेलेल्या लॅपटॉपमध्ये साठवलेली नाही. लॅपटॉपमध्ये सुरक्षेसाठी संरक्षक पासवर्ड टाकण्यात आलेले होते. क्रिकेट विश्वचषक सामन्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या ख्राईस्टचर्चच्या नॉर्थ हेगले पार्क येथे पार पडणार आहे.

Story img Loader