ICC Word Cup Opening Ceremony: आयसीसी विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामन्याच्या एक दिवस आधी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही केले जाणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारीही पूर्ण झाली असून, त्यात प्रेक्षणीय ‘लेझर शो’चाही समावेश असेल. तसेच, बॉलीवूड स्टार्स या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंग आणि प्रसिद्ध गायक अरिजित सिंग, गायक श्रेया घोषाल आणि आशा भोसले ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय हा दिवस ‘कॅप्टन डे’ म्हणून साजरा केला जाईल. ज्या चाहत्यांनी पहिल्या सामन्याची तिकिटे खरेदी केली आहेत तेच या सोहळ्याला उपस्थित राहू शकतील. या सोहळ्यात चाहत्यांना लेझर शो आणि आतषबाजीचा आनंद लुटता येणार आहे. आयसीसीच्या या कार्यक्रमात सर्व संघांचे कर्णधारही सहभागी होणार आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व्यतिरिक्त वरुण धवन आणि तमन्ना भाटिया या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गायकांमध्ये बॉलिवूड गायक अरिजित सिंग आपल्या गाण्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या समारोप समारंभातही तो सहभागी झाला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शंकर महादेवन यांच्याही उपस्थितीची जोरदार चर्चा आहे.
उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग प्रामुख्याने विश्वचषकाच्या गाण्यात दिसला होता. अशा परिस्थितीत तो कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या कार्यक्रमात गुजराती संस्कृतीही दाखवण्यात येणार आहे. ज्यासाठी तालीम केली जात आहे. हे सादरीकरण समारंभाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. चाहत्यांव्यतिरिक्त आयसीसी आणि बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारीही या सोहळ्याचा भाग असणार आहेत. याशिवाय सर्व क्रिकेट बोर्डाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.
सर्व विश्वचषक संघांचे कर्णधार
भारत: रोहित शर्मा
पाकिस्तान : बाबर आझम</p>
इंग्लंड: जोस बटलर
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स
न्यूझीलंड: केन विल्यमसन</p>
श्रीलंका: दासुन शनाका
बांगलादेश: शाकिब अल हसन
नेदरलँड: स्कॉट एडवर्ड्स
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी