हरहुन्नरी सलामीवीर अहमद शहजादने साकारलेल्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला. आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दुसऱ्या विजयानिशी पाकिस्तानने स्पध्रेतील उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम ठेवल्या. परंतु सलग तिसऱ्या पराभवामुळे यजमान बांगलादेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे या स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करू शकेल.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ५ बाद १९० अशी भक्कम धावसंख्या उभारली. याचे श्रेय शहजादने ९८ चेंडूंत केलेल्या नाबाद १११ धावांना द्यावे लागेल. उमर गुल व सईद अजमल यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांगलादेशला ७ बाद १४० धावा करता आल्या.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १९० (अहमद शहजाद नाबाद १११; अब्दुर रझाक २/२०) विजयी वि. बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १४० (शाकीब अल हसन ३८, नासिर हुसेन २३; उमर गुल ३/४०). सामनावीर : अहमद शहजाद.