कसोटी क्रिकेटचे महत्त्व टिकून रहावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेचा पहिला हंगाम (२०२१) न्यूझीलंडने जिंकला. सध्या सुरू असलेल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी विविध संघांची जोरदार चढाओढ सुरू आहे. या दरम्यान, आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने दिलेल्या माहितीनुसार २०२३ आणि २०२५ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. २६ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला. पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. हा सामना देखील लॉर्ड्सवर खेळवला जाणार होता. मात्र, कोविड १९ च्या अडथळ्यामुळे साउथम्प्टनमधील एजेस बाउल येथे हा सामना झाला होता.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Today is the last day to apply for various courses of Idol Mumbai print news
‘आयडॉल’च्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

हेही वाचा – ‘हा कोणाचा मुलगा आहे?’ पत्नी हेझलच्या पोस्टवरील युवराज सिंगची कमेंट व्हायरल

आयसीसीने नुकतीच न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी आणि भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सध्याचे खेळाडू प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. लक्ष्मण हा राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत भारतातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक म्हणून काम करत आहे. वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर हार्परची ‘पूर्व खेळाडू प्रतिनिधी’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आता तो श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेसोबत मिळून काम करणार आहे.

हेही वाचा – VIDEO : शिखर धवनच्या प्रश्नावर ड्रेसिंग रूममध्ये पिकला हशा; विजयानंतर साजरा केला जल्लोष

२०२३ आणि २०२५ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामने जूनमध्ये होतील. या काळात इंग्लंडमध्ये काऊंटी हंगाम सुरू असतो. त्यामुळे ऐनवेळी ठिकाणाबाबत गोंधळ होऊ नये, म्हणून आयसीसीने अगोदरच लॉर्ड्सची निवड केली आहे. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बर्कले यांनी हे स्पष्ट केले.