विजयाची गाडी रूळावर आणण्यासाठी आणि दुसऱ्या विजयासह एकूण सरासरीत वाढ करण्याची संधी न्यूझीलंडला मिळणार आहे. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या नेदरलँड्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने मोठय़ा विजयाचे उद्दिष्ट बाळगले आहे.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार इंग्लंडवर नऊ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर द. आफ्रिकेने न्यूझीलंडवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला होता. गटात तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंड संघ आता वरचे स्थान पटकावण्यासाठी उत्सुक आहे. न्यूझीलंडला दोन्ही सामन्यात सांघिक खेळ करता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी जलद अर्धशतके झळकावली. मात्र त्याचा फायदा अन्य फलंदाजांना उठवता आला नाही.