PAK vs NEP, Babar Azam: आशिया चषक २०२३ आजपासून (ऑगस्ट ३०) सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आशिया चषक स्पर्धेच्या ‘हायब्रीड मॉडेल’बाबत कोणताही मुद्दा उपस्थित करू इच्छित नाही, परंतु या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सर्व सामने आपल्या देशात आयोजित केले असते तर बरे झाले असते, असे त्याचे मत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचे अधिकार आहेत परंतु जय शाहच्या नेतृत्वाखालील आशियाई क्रिकेट परिषदेने काही सामन्यांचे यजमानपद श्रीलंकेसह हायब्रीड मॉडेलने दिले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांचाही समावेश आहे.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
eknath shinde challenge to mahavikas aghadi,
“तुम्ही अडीच वर्षांत काय केलं? समोरासमोर येऊन चर्चा करा”; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला थेट आव्हान!
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

बाबरने नेपाळविरुद्धच्या सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनाशी बोलताना याबाबत सूचक विधान केले. तो म्हणाला की, “जर तुम्ही मला विचारले आशिया चषक यजमानपदाबाबत तर मी सांगेन की, संपूर्ण स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला दिले असते तर बरे झाले असते. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही आणि याबाबत आता काहीही करता येऊ शकत नाही.” तो पुढे म्हणाला की, “एक क्रिकेटर म्हणून, आम्हाला कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार असतो. फक्त एका सामन्यानंतर लगेच एवढा प्रवास करणे आणि बॅक टू बॅक सामने खेळणे थोडे थकवणारे आहे मात्र, आम्ही त्यासाठीही तयार आहोत.”

हेही वाचा: Asia Cup 2023 Opening Ceremony: पाकिस्तान-नेपाळ सामन्याआधी रंगणार आशिया चषक उद्घाटन सोहळा कधी, कुठे, कसा? जाणून घ्या

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळसमोर यजमान पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानशी कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav: “मी रोहित, कोहली, द्रविड यांच्याशी बोललो…” ‘वन डेत यशस्वी का नाही’ या प्रश्नावर सूर्यकुमारचे सडतोड उत्तर

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.

नेपाळ: कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजवंशी.