Basit Ali’s Challenge to Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला नवे आव्हान मिळाले आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ पुढे आला नसला, तरी पीसीबीने अलीकडेच त्याला मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये पुन्हा संघाचे कर्णधारपद दिले आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने बाबरला टी-20 विश्वचषकापूर्वी आव्हान दिले आहे. अलीचे आव्हान असे आहे की बाबर आझमला आगामी विश्वचषकात अव्वल संघाविरुद्ध षटकार मारावे लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बासित अलीचे आव्हान काय आहे?

बाबर आझमला आव्हान देत असल्याचं बासित अली म्हणतो. बाबरला टी-२० विश्वचषकात अव्वल संघांविरुद्ध समोरच्या दिशेने सलग ३ षटकार मारावे लागतील. अली म्हणाला की, तो यूएसए, आयर्लंड किंवा युगांडासारख्या छोट्या संघांबद्दल बोलत नाही. बाबरला अव्वल संघाविरुद्ध सरळ पुढच्या दिशेला सलग ३ षटकार मारावे लागतील. बाबर यांनी हे आव्हान स्वीकारले तर पुढे येऊन सांगावे. बाबरने असे केले तर मी स्वत:चे यूट्यूब चॅनल बंद करेन, असा दावा बासित अलीने केला आहे. बाबरला हे जमत नसेल तर त्याने पाकिस्तानी संघात सलामीला फलंदाजी करणे सोडावी.

बाबर आझमने नव्या प्रशिक्षकावर विश्वास दाखवला –

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. कसोटी संघाची जबाबदारी जेसन गिलेस्पीकडे सोपवण्यात आली होती. बाबर म्हणाला की, गॅरी कर्स्टन हे खूप अनुभवी प्रशिक्षक आहेत आणि ते विश्वचषकाची तयारी खूप गांभीर्याने घेत आहेत. ते संघ व्यवस्थापनासोबत रणनीतीही शेअर करत आहेत. कर्स्टन सतत त्यांच्या योजना शेअर करत असून सरावाच्या वेळी खेळाडूंना मदतही करत आहेत.

हेही वाचा – IPL : शेन वॉटसनपासून ते हरभजनपर्यंत ‘या’ गोलंदाजांनी माहीला केलयं शून्यावर बाद, जाणून घ्या कोण आहेत?

बाबरची न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी –

पाकिस्तानने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता, पण शेवटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत बाबर आझमने ४ डाव खेळले, ज्यात त्याने १२५ धावा केल्या. मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने ६९ धावांची अर्धशतकी खेळी खेळून आपल्या चांगल्या फॉर्मचे संकेत दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If babar azam hits three straight sixes i will former cricketer basit ali challenges current t20 captain vbm