ICC Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेला गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने झाली. विश्वचषक स्पर्धेत बर्याच वेळा असे देखील होते, जेव्हा एकापेक्षा जास्त संघांचे समान गुण असतात, अशा परिस्थितीत निव्वळ धावगतीच्या जोरावर काही संघ क्वालिफाय होता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की जर नेट रन रेटही समान असेल तर कोणता संघ विश्वचषकात क्वालिफाय ठरतो? जाणून घेऊया.
सुपर-लीगच्या पॉइंट टेबलवर अवलंबून असेल –
जेव्हा जेव्हा दोन संघांचे समान पॉइंट असतात, तेव्हा खेळाडू त्यांच्या संघाला एकतर्फी सामना जिंकण्यासाठी आणि नेट रन रेट सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा पॉइंटव्यतिरिक्त रन रेटही सारखेच असते तेव्हा काय होते? याबद्दल जाणून घेऊया पॉइंटव्यतिरिक्त, कोणत्याही दोन संघांचे रन रेटही सारखे असेल, तर साखळी सामना जिंकलेल्या संघाला क्वालिफिकेशनचे तिकीट मिळेल. त्याचवेळी, समजा दोन्ही संघांमधील साखळी सामन्यात पाऊस पडला, त्यामुळे सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही, अशा परिस्थितीत, सुपर-लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला क्वालिफिकेशनचे तिकीट दिले जाईल.
कसे ते जाणून घ्या?
उदाहरण म्हणून समजा, पाकिस्तान आणि भारताचा पॉइंट आणि नेट रन रेट समान आहे. या दोघांमधील साखळी सामन्यातही निकाल लागला नाही. अशा परिस्थितीत भारत क्वालिफाय ठरेल, कारण भारत सुपर-लीगच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे.
आयसीसी विश्वचषक ४६ दिवस चालणार –
भारतात आयोजित होणारा हा विश्वचषक ४६ दिवस चालणार आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. या संघाचे सामने १० वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जातील. एकूण ४८ सामने होणार आहेत. पहिल्या टप्प्यात, प्रत्येक संघ राउंड रॉबिन पॅटर्न अंतर्गत इतर ९ संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. यानंतर टॉप-४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.