India Vs Australia 4th Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून अहमदाबादमध्ये शेवटचा सामना सुरु आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील या चौथ्या सामन्याचा आज तिसरा दिवस सुरु आहे. पण सुरुवातीच्या दोन्ही डावांचाच खेळ अजूनही सुरु आहे. आता सामन्याचे दोन दिवस उरले आहेत आणि दोन्ही इनिंगचा खेळ होणं बाकी आहे. अशा परिस्थितीत अहमदाबाद कसोटी सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदाबाद येथील कसोटी सामना ICC वर्ल्ड टेस्ट चॅप्मियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्याच्या अनुशंगाने खूप महत्वाचा आहे. जर टीम इंडिया हा सामना जिंकते, तर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारताला प्रवेश करता येईल. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना याचवर्षी ७ जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून ऑस्ट्रेलियाच्या संघाने आधीच WTC फायनलमध्ये जागा पक्की केली आहे. आता दुसऱ्या फायनलिस्टची प्रतिक्षा आहे. दुसऱ्या फायनलिस्टच्या दावेदारीत भारतीय संघाशिवाय श्रीलंकाही आहे.
फायनलसाठी भारत-श्रीलंका यांच्यात होणार महामुकाबला
दोन वर्षांपर्यंत चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा दुसरा सीजन आहे. या चॅम्पियनशिपचे ४ सामने बाकी आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा सामना महत्वाचा नाहीय. कारण दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. एक कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु आहे. जर अहमदाबाद कसोटी सामना रद्द झाला किंवा भारताचा पराभव झाला, तर सर्व गणित श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेवर अवलंबून असेल.
अशा परिस्थितीत डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडच्या विरुद्ध कसोटी मालिका २-० ने क्लीन स्वीप करून जिंकावी लागेल. ही मालिका न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील एक जरी सामना रद्द झाला किंवा श्रीलंकेचा पराभव झाला, तर त्या परिस्थितीत अहमदाबाद कसोटी सामन्यात पराभव होऊनही भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
अहमदाबाद टेस्ट रद्द झाली किंवा भारताचा पराभव झाल्यास, WTC फायनलचं समीकरण कसं असेल?
१) जर श्रीलंकाने दोन टेस्टच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडला क्वीन स्वीप केलं, तर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये श्रीलंकेची जागा पक्की होईल.
२) जर श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये दोन टेस्ट सीरिजमधील एक जरी सामना रद्द झाला, तर टीम इंडियाची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये जागा निश्चित होईल.
३) न्यूझीलंडच्या विरुद्ध दोन टेस्ट सीरिजमध्ये श्रीलंकेचा एका सामन्यात पराभव झाला, तर टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये एन्ट्री होईल.