India vs Australia, WTC 2023 Final: भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट अजिंक्यपद २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला, पण त्यांना किताब जिंकता आला नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला २०९ धावांनी पराभूत केले. या सामन्यासाठी भारताने दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नव्हता. त्यामुळे भारतावर अनेक दिग्गजांपासून ते चाहत्यांपर्यंत टीकास्त डागले. आता यामध्ये दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांचाही समावेश झाला आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी खेळाडू गावसकर पुढे म्हणाले की, “ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघांविरुद्धच्या आयसीसी सामन्यांमध्ये टीम इंडियाने आपल्या चुकांची पुनरावृत्ती करत खराब प्रदर्शन केले. त्यामुळे वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघांविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत विजय मिळवण्याचा काहीच अर्थ नाही. मोठ्या संघांविरुद्ध मोठ्या सामन्यांमध्ये जर तुम्ही खराब कामगिरीनंतरही काहीही बदल करणार नसाल तर अशा दौऱ्यांना काहीही अर्थ राहत नाही.”

हेही वाचा: IND vs AUS: कालपर्यंत एकमेकांशी भांडणारे आज लंडनमध्ये देतायत ‘कल हो ना हो’ची पोज, भज्जी-श्रीशांतचा मजेशीर Video व्हायरल

लिटल मास्टर गावसकर पुढे म्हणाले की, “वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामने खेळून त्यांचा दारूण पराभव करून आम्ही फॉर्ममध्ये आलो असे दाखवू शकत नाही. वेस्ट इंडिज हा जगातील सर्वोत्तम संघ नाही. आम्ही आता वेस्ट इंडिजला जात आहोत, आम्ही त्यांना २-० किंवा ३-० अशी धुळ चारू, हे महत्त्वाचे नाही कारण तो सर्वोत्तम संघ नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि मोठ्या फायनलमध्ये काय झाले ते सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही समोर फायनलला गेलात तेव्हा केलेल्या त्याच चुका लोकांच्या लक्षात राहतील.”

सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “आमची फलंदाजी लज्जास्पद होती. जे काही आपण आज पाहिले, ते खूपच खराब प्रदर्शन होते. खासकरून भारतीय फलंदाजांची शॉटची निवड वाईट होती. चेतेश्वर पुजाराकडून असे शॉट खेळण्याची अपेक्षा तुम्ही करूच शकत नाहीत. कदाचित त्याच्या डोक्यात काहीतरी घुसवले होते आणि त्याला स्ट्राईक रेट, स्ट्राईक रेट संघात कोणी बोलत असेल. तुम्ही एका सत्रापर्यंतही टिकू शकला नाहीत, आठ विकेट्स फक्त एका सत्रात कसे काय पडू शकतात?”

हेही वाचा: Lionel Messi: चीनने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला तब्बल अर्धा तास ठेवले ताटकळत, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या

विराट कोहलीची फलंदाजीवर ते म्हणाले, “तो एक फालतू शॉट होता. तो कोणता शॉट खेळला हे तुम्ही विराटला विचारायला हवे. तो सामना कसा जिंकायचा याबद्दल खूप बोलतो पण करत मात्र काहीच नाही. सामना जिंकण्यासाठी तुम्हाला मोठ्या खेळीची आवश्यकता असते. तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर इतका लांब चेंडू खेळलात तर ते कसे जिंकाल?”

“मी अशा संघांमध्ये होतो जिथे आम्ही ४२ धावांवर बाद झालो होतो आणि चेंज रूममध्ये आमची दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी आमच्यावर खूप टीकाही झाली होती. त्यामुळे, मला वाटते की तुम्ही असे म्हणू शकत नाही की सध्याची स्थिती टीकेच्या पलीकडे नाही. त्यांना ही टीका सहन करावी लागेल. काय झाले, ते कसे आउट झाले, त्यांनी चांगली गोलंदाजी का केली नाही, त्यांनी झेल का घेतला नाही, प्लेइंग इलेव्हनची निवड योग्य गोष्ट होती का, या सर्व बाबींचा ओहापोह करणे आवश्यक आहे, ” गावसकर स्टार स्पोर्ट्सवर सामन्यानंतर बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If india wins 2 0 3 0 against west indies still it cant be forgotten wtc final vs australia sunil gavaskar criticizes indian team avw