Rohit Sharma a century in World Cup 2023 he will break Sachin Tendulkar’s record: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषकात इतर संघांशी सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज दिसत आहे. भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या १३व्या हंगामात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि पुन्हा एकदा त्याच्या देशात गेल्या विश्वचषकातील म्हणजेच २०१९ च्या कामगिरीची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या विश्वचषकात रोहितने ५ शतकांसह सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि तो सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शतक झळकावताच रोहित मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम –

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही फलंदाजांनी एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक ६-६ शतके झळकावली आहेत, परंतु रोहित शर्माने या विश्वचषकात शतक झळकावताच तो एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनेल. तसेच सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर येईल.

हेही वाचा – VIDEO: ‘भारतातील ‘या’ दोन शहरात पाकिस्तान संघाला मिळणार जास्त पाठिंबा’; माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदचं मोठं वक्तव्य

रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत १७ सामन्यांच्या १७ डावांमध्ये ६ शतकांसह ९७८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या सामन्यांमध्ये ६५.२० च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच एकदिवसीय विश्वचषकातील त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या १४० धावा आहे. या सामन्यांमध्ये त्याने १०० चौकार आणि २३ षटकार मारले आहेत. सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे, तर त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४५ सामन्यांच्या ४४ डावांमध्ये ६ शतकांसह २२७८ धावा केल्या आहेत, यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १५२ धावा आहे.

हेही वाचा – World Cup 2023 सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला बसला मोठा धक्का, कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्यातून झाला बाहेर

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारे अव्वल पाच फलंदाज –

रोहित शर्मा- ६ शतके
सचिन तेंडुलकर- ६ शतके
सौरव गांगुली- ४ शतके
शिखर धवन- ३ शतके
राहुल द्रविड – २ शतके

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If rohit sharma scores a century in the odi world cup 2023 he will break sachin tendulkars record for most centuries vbm
Show comments