Ravichandran Ashwin: जेव्हा जेव्हा मांकडिंग म्हणजेच नॉन स्ट्रायकिंग एंडवर धावबाद होण्याची वेळ येते तेव्हा अचानक भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे ​​नाव समोर येते. नॉन स्ट्राइकवर धावबाद होण्याची गोष्ट जरी अनेक दशके जुनी असली, तरी आयपीएलदरम्यान आर. अश्विनने जोस बटलरला धावबाद केल्यावर ती चर्चेत आली. हे खेळाच्या भावनेच्या विरोधात असल्याची चर्चा जरी त्यावेळी झाली असली तरी आता त्याला अधिकृतपणे रनआऊटचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शादाब खान नॉन स्ट्राइक एंडवर धावबाद झाल्यावर पुन्हा वादाला तोंड फुटले, ज्याला आर. अश्विनने सडेतोड उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका क्रीडा पत्रकाराने सांगितले की, “मोठ्या सामन्यांमध्ये आम्ही कोणीही नॉन स्ट्राइकवर धावबाद झाल्याचे पाहिले नाही. केवळ तेच देश याला पाठिंबा देत आहेत, ज्यांनी अद्याप सामना केलेला नाही किंवा अनेकदा त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला आहे.” त्या पत्रकाराने असेही पुढे सांगितले की, “इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या देशांचे खेळाडू याला विरोध करत आहेत. महिला क्रिकेट आणि आयपीएलमुळे या गोष्टींना पाठबळ मिळत असल्याचा आरोपही त्याने केला.” मात्र, आर. अश्विन यावर नाराज असून “जर फलंदाज क्रीजमध्ये राहिला तर बरे होईल,” असे सांगितले.

हेही वाचा: Neeraj Chopra Wins Gold: नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकून इतिहास रचला, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

अश्विनने ट्वीटरवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणाला की, “हे परिस्थितीचे योग्य आकलन आहे. कल्पना करा की कोणीतरी कोहली, रोहित, स्मिथ, रूट किंवा कोणताही महत्त्वाचा फलंदाज नॉन-स्ट्रायकरवर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, अटीतटीच्या सामन्यात किंवा १०० धावांच्या नजीक खेळत असेल आणि त्याला असे धावबाद केले तर काय होईल? मला खात्री आहे की प्रत्येकजण भडकला असेल आणि काही तज्ञांकडून चारित्र्यहननची सोशल मीडियावर मोहीम चालवली जाईल. त्यामुळे मी अशा वागण्याशी सहमत नाही. ज्यांना अजूनही खात्री नाही आणि अर्थातच चाहते त्याची किंमत मोजत आहेत.” अश्विनने पुढे उपाय सांगितले की काय करावे?

हेही वाचा: World Athletics Championships जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा: भारतीय पुरुष रिले संघाचा आशियाई विक्रम

अश्विनने गोलंदाजाचे कौतुक केले

अश्विनने पुढे लिहिले की, “यावर एकच उपाय आहे, फलंदाज कोणीही असो आणि परिस्थिती कशीही असो, फलंदाजाने हे पाहिले पाहिजे की गोलंदाज चेंडू टाकत आहे आणि तो सोडण्यापूर्वी त्याचा खांदा फिरवत असताना जर तो क्रीजच्या बाहेर गेला तर तो नक्की आउट होणार. त्यावेळी आपण गोलंदाजाचे कौतुक केले पाहिजे आणि फलंदाजांना सांगितले पाहिजे की, तो आणखी चांगली कामगिरी करू शकतो. त्याने त्याची कृती अजिबात पूर्ण केलेली नाही. फलंदाजाने ५-६व्या षटकातच हे सर्व ओळखून काळजी घेतली पाहिजे, कारण इथे तर्क निरुपयोगी आहेत. एकदा गोलंदाज गोलंदाजी करायला तयार झाला, तर तो फलंदाजाला धावबाद करू शकत नाही, कारण कायद्यानुसार ते चुकीचे आहे.”

अश्विनने शेवटी लिहिले की, “सर्व संघ सध्या असे करत नाहीत, पण विश्वचषक येऊ घातला आहे, मला खरोखर आशा आहे की प्रत्येकजण त्यासाठी तयार असेल. कारण, नैतिक भूमिका घेऊन आम्ही असे करणार नाही असे म्हणत, इतरांसाठी एक धोरणात्मक विंडो उघडली पाहिजे. खरे तर संघांनी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक फायद्याचा फायदा घेतला पाहिजे कारण विश्वचषक जिंकणे ही आयुष्यभराची उपलब्धी असते. शेवटी, सर्वकाही जिंकणे हेच आहे का? याचाही विचार करायला हवा. हे काहींसाठी सर्व काही आहे आणि इतरांसाठी काहीच नाही, आपण दोन्ही स्वीकारले पाहिजे कारण आपण इथे आपण एक खेळाडू म्हणून आहोत. त्यामुळे क्रीजमध्ये राहा आणि शांतपणे जगा.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If someone runs kohli out in the world cup then ashwins post about mankading went viral avw
Show comments